Samsung चे सरप्राइज, एक साथ लॉन्च केले Galaxy A21, Galaxy A11 आणि Galaxy A01 स्मार्टफोन

Samsung ने आपल्या यूजर्सना सरप्राइज देत ‘गॅलेक्सी ए’ सीरीज मध्ये एक साथ पाच नवीन फोन जोडले आहेत. कंपनीने Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51 सारख्या 5G फोन्स सोबतच Samsung Galaxy A21, Galaxy A11 आणि Galaxy A01 पण सादर केले आहेत. सॅमसंगने हे सर्व नवीन स्मार्टफोन्स आता यूएस मधेच आणले आहेत जे आगामी काळात भारतासह इतर मार्केट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील. चला एक नजर टाकूया Samsung च्या या स्वस्त स्मार्टफोन्स वर आणि बघूया यांची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

Samsung Galaxy A21

सॅमसंग गॅलेक्सी ए21 कंपनीने से पंच-होल डिस्प्ले वर सादर केला आहे. फोनची स्क्रीन तिन्ही बाजूंनी बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला थोडा रुंद बॉडी पार्ट आहे. पंच-होल डिस्प्लेच्या डावीकडे आहे ज्याला सॅमसंगने इनफिनिटी-ओ डिस्प्लेचे नाव दिले आहे. हा फोन 6.5 इंचाच्या एचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण दोन्ही फोनच्या उजव्या पॅनल वर देण्यात आले आहेत. गॅलेक्सी ए21 को 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे तसेच फोन मेमरी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो उपरी उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये स्थित आहे. या सेटअप मध्ये 16 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे सोबत 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. सेल्फीसाठी हा फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 15वॉट फास्ट चार्जिंग वाली 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A11

सॅमसंग गॅलेक्सी ए11 लुक आणि डिजाईनच्या बाबतीत गॅलेक्सी ए21 सारखा आहे. हा पण पंच-होल डिस्प्ले वर सादर झाला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला थोडा रुंद बॉडी पार्ट आहे. सॅमसंगने आपला हा फोन 6.4 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी-ओ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. गॅलेक्सी ए11 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये 13 मेगापिक्सलची प्राइमरी वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy A01

सॅमसंग गॅलेक्सी ए01 कंपनीने बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर सादर केला आहे. फोन स्क्रीनच्या तिन्ही कडा नॅरो बेजल्स सह मिळतात तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. कंपनीने हा फोन 5.7 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी-वी डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. गॅलेक्सी ए01 मध्ये 2 जीबी रॅम देण्यात आला आहे त्याचबरोबर हा फोन 16 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी ए01 मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

Samsung Galaxy A21 = $249.99 (जवळपास 19,000 रुपये)

Samsung Galaxy A11 = $179.99 (जवळपास 13,500 रुपये)

Samsung Galaxy A01 = $109.99 (जवळपास 8,300 रुपये)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here