Jio चा नवीन धमाका! फक्त 61 रुपयांमध्ये देत आहे 10GB Data! जाणून घ्या माहिती

Highlights

  • हा Data Booster रिचार्ज आहे.
  • ह्यात कॉल किंवा SMS बेनिफिट नाहीत.
  • प्रीपेड युजर हा रिचार्ज वापरू शकतात.

Reliance Jio वेळोवेळी असे रिचार्ज प्लॅन आणि ऑफर सादर करत असते जे कंपनी युजर्ससाठी फायदेशीर असतात तसेच इतर टेलीकॉम ऑपरेटर्सच्या तुलनेत स्वस्त आणि बेस्ट देखील ठरतात. आपल्या ग्राहकांसाठी कंपनीनं आता 61 रुपयांचा Data Booster Recharge Plan सादर केला आहे ज्यात एकूण 10GB Data मिळतो.

जियो 61 रुपयांचा प्लॅन

  • कंपनीनं हा ‘डाटा बूस्टर’ रिचार्ज प्लॅन्सच्या श्रेणीत ठेवला आहे.
  • ह्याची किंमत फक्त 61 रुपये आहे.
  • हा प्लॅन कोणत्याही वैधतेविना येतो.
  • ह्या प्लॅनमध्ये जियो ग्राहकांना 10जीबी डेटा मिळतो.
  • ह्या रिचार्जसह कॉलिंग किंवा एसएमएस बेनिफिट मिळत नाहीत.
  • ह्याचा लाभ आधीपासून सक्रिय असलेल्या प्लॅनच्या वैधतेत घेता येतो.
  • 10जीबी डेटा संपल्यावर 64Kbps स्पीडनं इंटरनेट वापरता येईल.

डाटा बूस्टर रिचार्ज प्लॅनचा फायदा

  • हा पॅक अ‍ॅक्टिव्ह झाल्यावर ‘डेली डेटा’ चं टेंशन राहत नाही.
  • गरजेच्या वेळी उपलब्ध डेटा संपल्यावर हा डेटा बूस्टर कामी येतो.
  • IPL पाहताना जर डेटा संपला तर ह्या डेटावर मॅच कंटिन्यू पाहता येईल.
  • जर एखादी मोठी फाईल इंटरनेटवरून डाउनलोड किंवा अपलोड करताना हा डेटा वापरता येईल.
  • आधी 61 रुपयांमध्ये 6जीबी डेटा मिळत होता परंतु आता 10जीबी मिळत आहे. म्हणजे 4जीबी एक्स्ट्रा डेटाचा फायदा.

जियो डेटा बूस्टर रिचार्ज प्लॅन्स

  • 15 रुपये
  • 25 रुपये
  • 121 रुपये
  • 222 रुपये

जियोचा 15 रुपयांचा डेटा बूस्टर प्लॅन 1 जीबी डेटासह येतो. ह्यात कोणतेही कॉल किंवा मेसेज मिळत नाहीत आणि ह्याची वैधता देखील सक्रिय प्लॅन इतकी आहे.

25 रुपयांच्या जियो डेटा बूस्टर प्लॅन 2जीबी डेटासह येतो. हा रिचार्ज देखील सक्रिय प्लॅनच्या व्हॅलिडिटी सोबतच चालतो.

61 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना 10जीबी डेटा दिला जात आहे. तर 121 रुपयांच्या डेटा बूस्टर प्लॅनमध्ये जियो आपल्या ग्राहकांना 12जीबी डेटा देत आहे.

Data Booster Recharge Plans मध्ये सर्वात मोठा पॅक 222 रुपयांचा आहे. हा Jio रिचार्ज पॅक 50जीबी डेटा देतो ज्याचा लाभ सक्रिय प्लॅनसह घेता येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here