चार्जिंगविना 100KM धावेल ही स्वस्त Electric Scooter; आग लागण्याची देखील भीती नाही

100KM Range Electric Scooter Komaki Venice Eco Launch With Fire Resistant Technology Price Sale

Komaki Venice Eco Electric Scooter Launch: जर तुम्ही यंदा दिवाळीत एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेण्याचा विचार करत असेलतर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण कमी खर्चात जास्त रेंज असेलेली एक नवीन Electric Scooter भारतात लाँच झाली आहे. इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता Komaki नं भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Komaki Venice Eco सादर केली आहे. या Electric Two-Wheeler ची खासियत म्हणजे हाय-स्पीड आणि कमी किंमत. या बजेट फ़्रेंडली इलेक्ट्रिक स्कूटरचीकी किंमत, फीचर्स आणि सर्व स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Komaki Venice Eco Electric Scooter चे लुक आणि फीचर्स

ही बॅटरी असलेली स्कूटी खूप आकर्षक दिसते. कंपनीनं हे हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर सफेद आणि निळ्या रंगसह सात वेगवेगळ्या कलर ऑप्शन (Garnet Red, Sacramento Green, Jet Black, Metallic Blue, Bright Orange आणि Silver) मध्ये सादर केली आहे. तसेच स्टाइलच्या बाबतीत देखील व्हीनस ईसीओच्या फ्रंटला कोमाकी ब्रँडिंगसह एक गोल एलईडी हेडलॅम्प मिळतो. तसेच या इलेक्ट्रिक टू-व्हीलरमध्ये अतिरिक्त बॅकरेस्ट, बूट स्पेससह एक आरामदायक सीट, नेव्हिगेशनसह टीएफटी स्क्रीन, एक फ्रंट स्टोरेज कम्पार्टमेंट आणि सेल्फ डायग्नोसिस आणि रिपेयरसाठी खास बटनचा समावेश देखील आहे. हे देखील वाचा: आयफोनच्या तोडीचा फोन आज येतोय! भारतात देखील Google Pixel 7, Pixel 7 Pro होणार लाँच, जाणून घ्या किंमत

100KM Range Electric Scooter Komaki Venice Eco Launch With Fire Resistant Technology Price Sale

Komaki Venice Eco चे स्पेसिफिकेशन्स

Komaki Venice Eco इलेक्ट्रिक स्कूटर लिथियम फेरो फॉस्फेट (LiPO4) बॅटरीसह बाजारात आली आहे. कंपनीचा दावा आहे या की इलेक्ट्रिक स्कूटर मधील बॅटरी 100 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते आणि ही फुल चार्ज होण्यास 3 ते 4 तासांचा वेळ घेते. त्याचबरोबर ही इलेक्ट्रिक स्कूटर प्रति चार्ज 1.8 ते 2 यूनिट खर्च करते, असा दावा करण्यात आला आहे. या पावरट्रेनसह ही ब्रँडच्या 11 लो-स्पीड आणि सहा हाय-स्पीड इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सच्या लाइनअपमध्ये समाविष्ट होईल.

फायर प्रूफ टेक्नॉलॉजीचा वापर

इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये स्फोट झाल्याच्या आणि आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ग्राहक ही वाहने खरेदी करण्यापासून कचरत आहेत. कंपनीनं या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं नाही. कंपनीचा दावा आहे की या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अ‍ॅडव्हान्स बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (BMS), मल्टीपल थर्मल सेन्सर, अ‍ॅप-बेस्ड कनेक्टिव्हिटीसह आग प्रतिरोधक LFP टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर फायर प्रूफ आहे, कंपनीनं म्हटलं आहे. म्हणजे या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागण्याची भीती राहणार नाही.

100KM Range Electric Scooter Komaki Venice Eco Launch With Fire Resistant Technology Price Sale

Komaki Venice Eco ची किंमत

ही बजेट फ़्रेंडली इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीनं 79,000 रुपये (एक्सशोरूम) मध्ये सादर केली आहे. त्यामुळे भारतीय बाजारात आधीपासून उपलब्ध असलेल्या Ola S1, एथर इलेक्ट्रिक स्कूटर, ओकिनावा सारख्या इलेक्ट्रिक स्कूटर्सना या मॉडेलकडून चांगली टक्कर मिळणार, हे निश्चित. हे देखील वाचा: स्मार्टफोन असावा तर असा! 200MP कॅमेरा, 180W फास्ट चार्जिंग; Infinix Zero Ultra 5G ची किंमतही कमी