108MP Camera असलेला Infinix फोन 14 जूनला येईल भारतात, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Highlights

  • Infinix Note 30 5G फोन 14 जूनला भारतात लाँच होईल.
  • हा मोबाइल फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव्ह असेल

इनफिनिक्स कंपनी भारतात दमदार 108 मेगपिक्सल कॅमेरा असलेला मोबाइल घेऊन येत आहे. हा Infinix Note 30 5G असेल जो 14 जूनला भारतात लाँच केला जाईल. लाँच डेटची घोषणा करण्यासोबतच कंपनीनं फोनचं प्रोडक्ट पेज देखील शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर लाइव्ह केलं आहे ज्यात फोनच्या डिजाईनसह अनेक फीचर्स व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा देखील झाला आहे.

इनफिनिक्स नोट 30 5जी लाँच व डिटेल

Infinix Note 30 5G फोन 14 जूनला भारतात लाँच होईल. हा मोबाइल फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव्ह असेल आणि इथून विक्रीसाठी उपलब्ध होईल. फोनची विक्री जूनच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होऊ शकते तसेच आशा आहे की इनफिनिक्स नोट 30 5जी Blue, Black आणि Sunset Gold कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Infinix Note 30 5G स्पेसिफिकेशन्स

  • 6.78″ 120Hz Display
  • MediaTek Dimensity 6080
  • 108MP Rear Camera
  • 16MP Rear Camera
  • 45W Fast Charging
  • 5,000mAh Battery
  • स्क्रीन : या फोनमध्ये 6.78 इंचाचा पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे जो एलसीडी पॅनलवर बनला तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटवर चालतो.
  • प्रोसेसर : इनफिनिक्स नोट 30 5जी फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6080 ऑक्टाकोर प्रोससरवर चालतो.
  • रियर कॅमेरा : रियर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/1.75 अपर्चर असलेल्या 108MP Samsung ISOCELL HM6 सेन्सरसह 2एमपी लेन्स आणि एआय सेन्सर आहे.
  • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी इनफिनिक्स नोट 30 5जी फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते.
  • कनेक्टिव्हिटी : Infinix Note 30 5G फोनमध्ये एनएफसी, 3.5एमएम जॅक आणि एफएम रेडियो सारखे फीचर्स मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here