108MP Camera आणि 67W Fast Charging सह येऊ शकतो OPPO A98; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्स आले समोर

OPPO कंपनीसंबंधित एक मोठी बातमी आता समोर आली आहे की ओप्पो अपनी ‘ए’ सीरीजच्या एका नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो OPPO A98 नावाने लाँच होऊ शकतो. ओप्पो ए98 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स संबंधित बरीच महत्वाची माहिती चीनी मायक्रोब्लागिंग साइट वेईबोवर शेयर करण्यात आली आहे ज्यावरून समजलं आहे की ओप्पो ए98 स्मार्टफोन 108MP Camera आणि 67W Fast charging सह लाँच होऊ शकतो.

OPPO A98 Specification

ओप्पो ए98 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता, समोर आलेल्या माहितीनुसार हा ओप्पो मोबाइल पंच-होल स्टाइल डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो जो फुलएचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करू शकतो तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालू शकतो. लीकनुसार, या स्मार्टफोनची स्क्रीन कर्व्ड एजसह येऊ शकते. OPPO A98 बद्दल सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो जो 5जी नेटवर्कला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: OLA च्या इलेक्ट्रिक स्कूटीला टक्कर देण्यासाठी आली ‘Baaz’, किंमत फक्त 35000 रुपये

OPPO A98 कॅमेरा सेग्मेंट देखील दमदार असेल. लीकनुसार, हा ओप्पो मोबाइल फोन 108 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरसह लाँच केला जाऊ शकतो. ओप्पो ए98 12 जीबी पर्यंतच्या रॅमवर लाँच होऊ शकतो ज्यात 256 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेज असू शकते. तसेच पावर बॅकअपसाठी ओप्पो ए98 स्मार्टफोनमध्ये 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते जोडीला 5,000एमएएचची बॅटरी असू शकते.

OPPO A97 चे स्पेसिफिकेशन्स

अगर ओप्पो ए97 स्मार्टफोन 6.6 इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा ओप्पो मोबाइल देखील 12 जीबी पर्यंतच्या रॅमवर चालतो परंतु प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 810 चिपसेट देण्यात आला आहे. चिपसेट देखील 5जी नेटवर्कवर चालतो. हे देखील वाचा: नोकियाचा स्वस्त 5G फोन येतोय भारतीयांच्या भेटीला; 6GB रॅमसह होईल Nokia G60 5G ची एंट्री

फोटोग्राफीसाठी OPPO A97 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या ओप्पो मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट सुपरवूक चार्जिंगसह येते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here