Redmi 13 5G फोन भारतात लाँच झाला आहे. 108MP कॅमेरा, 8GB RAM आणि 5030mAh बॅटरीने सुसज्ज असलेल्या या फोनने कमी बजेटच्या सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे आणि Redmi 13 5G ची किंमत फक्त 13999 रुपयांपासून सुरू होते. पुढे तुम्ही Redmi 13 5G ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनचे संपूर्ण तपशील वाचू शकता.
Redmi 13 5G ची किंमत आणि ऑफर
- 6GB रॅम + 128GB मेमरी – 13,999 रुपये
- 8GB रॅम + 128GB मेमरी – 15,499 रुपये
Redmi 13 5G फोन 6GB रॅम आणि 8GB रॅम सह भारतात लाँच करण्यात आला आहे. मोबाईलच्या 6GB मॉडेलचा दर 13,999 रुपये आहे आणि 8GB Redmi 13 5G चा दर 15,499 रुपये आहे. या फोनची विक्री 12 जुलैपासून सुरू होईल आणि तो कंपनीच्या वेबसाईट आणि ॲमेझॉनसह रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येईल. सुरुवातीच्या सेलमध्ये कंपनी या फोनवर 1000 रुपयांची बँक सूट देईल, त्यानंतर Redmi 13 5G ची प्रभावी किंमत अनुक्रमे 12,999 रुपये आणि 14,499 रुपये असेल.
Redmi 13 5G चे डिझाईन
- Redmi 13 5G फोन Crystal Glass Design वर तयार केला आहे, ज्याच्या समोर आणि मागील दोन्ही पॅनलवर ग्लासचा थर आहे.
- कंपनीचे म्हणणे आहे की सेगमेंटमधील हा एकमेव 5G स्मार्टफोन आहे जो ड्युअल साईड ग्लासला सपोर्ट करतो.
- फोनच्या फ्लॅट रिअर पॅनलवर दोन कॅमेरा सेन्सर आणि फ्लॅश लाईट असलेला सेटअप लावण्यात आला आहे.
- उजव्या फ्रेमवर व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण उपस्थित आहे.
- वरच्या फ्रेमवर 3.5एमएम जॅक आणि खालच्या फ्रेमवर युएसबी पोर्ट आहे.
- Redmi 13 5G हा हवाईयन ब्लू, ब्लॅक डायमंड आणि स्टायलिश ऑर्किड पिंक या रंगांमध्ये खरेदी करता येईल.
Redmi 13 5G चे स्पेसिफिकेशन
अप्रतिम डिस्प्ले
Redmi 13 5G मध्ये फ्लॅट पॅनल असलेली पंच-होल स्क्रीन देण्यात आली आहे. हा मोबाइल 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशन असलेल्या 6.79 इंचाच्या FHD+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर काम करतो. कंपनीने याला वेट फिंगर टच डिस्प्ले असे नाव दिले आहे, जो ओल्या हातानेही ऑपरेट केला जाऊ शकतो. तर स्क्रीनचे संरक्षण करण्यासाठी याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने संरक्षित केले आहे
शक्तिशाली परफॉर्मन्स
Redmi 13 5G फोन अँड्रॉइड 14 वर लाँच करण्यात आला आहे, जो HyperOS सह मिळून काम करतो. प्रोसेसिंग साठी या मोबाईलमध्ये 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनवलेला Qualcomm Snapdragon 4 Gen 2 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. जो 1.95GHz पासून 2.3GHz पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये अँड्रेनो 613 जीपीयू आहे.
आश्चर्यकारक कॅमेरा
फोटोग्राफीसाठी Redmi 13 5G हा स्मार्टफोन ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनेलवर एलईडी फ्लॅशसह सुसज्ज असलेला 108 मेगापिक्सेलचा Samsung ISOCELL HM6 मुख्य सेन्सर दिलेला आहे, जो एफ/1.75 अपर्चरवर काम करतो. मागील कॅमेरा सेटअपमध्ये 2 मेगापिक्सेलची मॅक्रो लेन्स देखील समाविष्ट आहे. Redmi 13 5G हा 13 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो एफ/2.45 अपर्चरवर काम करतो.
मजबूत बॅटरी
Redmi 13 5G फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी मजबूत अशी 5030mAh ची बॅटरी दिली गेली आहे. पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बॅटरी सामान्य वापरात 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ स्टँडबाय वेळ देण्याची क्षमता ठेवते. ही मोठी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी या नवीन Redmi 5G फोनला 33W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज केले गेले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ते 30 मिनिटांत 50 टक्के बॅटरी चार्ज करू शकते.
Redmi 13 5G चे फिचर्स
- हा Redmi फोन 7 5G बँडला सपोर्ट करतो.
- Redmi 13 5G मध्ये IR ब्लास्टर देखील देण्यात आला आहे.
- फोन थंड ठेवण्यासाठी त्यात ग्रेफाइट शीट्स कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे.
- सुरक्षेसाठी या स्मार्टफोनच्या साईड फ्रेमवर फिंगरप्रिंट सेन्सर बसवण्यात आला आहे.
- कनेक्टिव्हिटीसाठी, Redmi 13 5G हा Bluetooth 5 आणि 5GHz Wi-Fi ला सपोर्ट करतो.
- मनोरंजनासाठी Redmi 13 5G फोनमध्ये सिंगल स्पीकर आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे.
Redmi 13 5G ची स्पर्धा
Redmi 13 5G फोनची किंमत श्रेणी पाहता असे म्हणता येईल की, या बजेटमध्ये आधीच बाजारात असलेले Vivo T3 Lite आणि Realme NARZO 70x हे Redmi साठी आव्हान बनू शकतात. त्याचवेळी, 15 जुलै रोजी लाँच होणारा iQOO Z9 Lite देखील Redmi 13 5G फोनशी स्पर्धा करू शकतो.















