भारतात 5G service ची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेरीस संपणार आहे. भारताचे Prime Minister Narendra Modi यांच्या हस्ते 4 दिवसांनी म्हणजे 1 ऑक्टोबरला 5G लाँच केलं जाईल. 23 सप्टेंबरला National Broadband Mission च्या अधितकृत ट्विटर हँडलवरून माहिती देण्यात आली की 5G network 1 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या Indian Mobile Congress (IMC 2022) मध्ये लाइव्ह (5G live) केलं जाईल. त्यानंतर दिवाळीपर्यंत Airtel 5G, Jio 5G आणि Vi 5G सर्व्हिस पण लाइव्ह होण्याची शक्यता आहे. दरम्यान NBM नं आपलं Tweet एक दिवसांनी हटवलं, त्यामुळे 1 ऑक्टोबरला 5G Launch होणार का हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
1 ऑक्टोबरला लाँच होणार का 5G
23 सप्टेंबरला नॅशनल ब्रॉडबँड मिशन (NBM) नं एक ट्वीट केलं ज्यात लिहिण्यात आलं होतं की 1 ऑक्टोबरला इंडिया मोबाइल कांग्रेसमध्ये पीएम मोदी 5जी लाँच करतील. परंतु काही वेळानं NBM च्या ट्विटर हँडलवरून ट्वीट डिलीट करण्यात आलं. त्यानंतर मोबाइल इंडिया कांग्रेसनं देखील 5जी लाँच बद्दल काही सांगितलं नाही. त्यामुळे एक ऑक्टोबरला देशात 5जी लाँचची बातमी निराधार वाटते. हे देखील वाचा: 7,000mAh च्या दणकट बॅटरीसह नवीन Tecno Mobile ची एंट्री; फोनमध्ये 6GB RAM आणि 16MP Camera
12 ऑक्टोबरला लाइव्ह होणार 5G?
केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांना सांगितलं होतं की आम्ही 5जी सेवा वेगानं सुरु करण्याची योजना बनवत आहोत. दूरसंचार ऑपरेटर याबाबत काम करत आहेत आणि इंस्टॉलेशन केले जात आहेत. आशा आहे की 12 ऑक्टोबरपर्यंत 5जी सर्व्हिस सुरु होईल आणि त्यानंतर शहर आणि वस्त्यांमध्ये याचा विस्तार होईल. केंद्रीय मंत्र्यांनी विश्वास दर्शवला के पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये देशातील प्रत्येक भागात 5जी पोहोचेल.
आधी देखील आली होती 5G लाँचची तारीख
5G स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर बातम्या आली होत्या की भारतात 5G सेवा 15 August 2022 लाँच केली जाऊ शकते, परंतु तसं झालं नाही. तसेच जियो आणि एयरटेलद्वारे दिवाळीपर्यंत 5G सर्व्हिस लाइव्ह केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार दोन्ही कंपन्या सुरुवातीला 4G इतक्या किंमतीतच 5G सर्व्हिस लाँच करतील, त्यामुळे ग्राहकांना 5G चा अनुभव घेता येईल. ग्राहक संख्या वाढल्यानंतर ही किंमत वाढवली जाऊ शकते. हे देखील वाचा: 70 हजारांपेक्षा स्वस्तात मिळणाऱ्या Electric Scooter; सिंगल चार्जमध्ये मिळेल 120 km ची रेंज, पाहा यादी
या 13 शहरांमध्ये 2022 मध्ये सर्वप्रथम मिळू शकते 5G सर्व्हिस
DoT म्हणजे Department of Telecommunications नुसार देशात 13 अशी शहरं आहेत जिथे सर्वप्रथम 5जी नेटवर्क सादर करण्यात येईल. या शहरांच्या यादीत Mumbai, Pune Ahmedabad, Bengaluru, Chandigarh, Chennai, Delhi, Gandhinagar, Gurugram, Hyderabad, Jamnagar, Kolkata आणि Lucknow चा समावेश आहे. परंतु केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आली नाही.