15 हजारांच्या बजेटमध्ये 108MP कॅमेरा असलेला फोन, Tecno Pova 6 Neo 5G vs Infinix Note 40X 5G

जर 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये 108 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला फोन घ्यायचा असेल, तर भारतीय बाजारात दोन नवीन फोन विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. आम्ही Tecno Pova 6 Neo 5G आणि Infinix Note 40X 5G बद्दल बोलत आहोत. हे दोन्ही स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरवर काम करतात आणि 108 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 5,000mAh च्या बॅटरीला सपोर्ट करतात. पुढे तुम्ही Tecno Pova 6 Neo आणि Infinix Note 40X ची तुलना वाचू शकता.

स्पेसिफिकेशनची तुलना

डिस्प्ले

Tecno POVA 6 Neo 5G फोन 720 × 1600 पिक्सेल रिझोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या एचडीप्लस डिस्प्लेवर लाँच करण्यात आला आहे. ही एक आयपीएस एलसीडी स्क्रीन आहे ज्यावर 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटसह 480निट्स ब्राईटनेस मिळत आहे.

Infinix Note 40X मध्ये 1080 x 2460 पिक्सेल रिझोल्यूशन असलेला 6.78 इंचाचा फुलएचडी + पंच-होल डिस्प्ले दिला आहे. ही देखील एक पंच-होल स्टाईल स्क्रीन आहे जी आयपीएस एलसीडी पॅनेलवर बनलेली आहे आणि 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 500निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करते.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Techno Pova 6 Neo 5G फोन ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर एलसीडी फ्लॅश ने सुसज्ज असा 108 मेगापिक्सेलचा सेन्सर दिला आहे जो एआय लेन्ससह मिळून काम करतो. या स्मार्टफोनमध्ये 3x लॉसलेस सेन्सर झूम देखील मिळत आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओसाठी नवीन टेक्नो मोबाईलमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे.

Infinix Note 40X स्मार्टफोनमध्ये देखील ट्रिपल रिअर कॅमेरा दिला गेला आहे. त्याच्या मागील पॅनेलवर ही 108 मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर उपलब्ध आहे, जो 2 मेगापिक्सेलची मॅक्रो लेन्स आणि एआय लेन्स सोबत मिळून काम करतो. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये देखील 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर उपलब्ध आहे.

प्रोसेसर

Tecno Pova 6 Neo 5G आणि Infinix Note 40X 5G हे दोन्ही स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी 6300 वर तयार केलेले आहेत. हा 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला एक ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे ज्यामध्ये 2.4 गिगाहर्ट्स क्लॉक स्पीड असलेले दोन कोर आणि 2.0 गिगाहर्ट्स क्लॉक स्पीड असलेले सहा कोर समाविष्ट आहेत. समान प्रोसेसर असूनही त्यांच्या परफॉर्मन्समध्ये काय फरक आहे, हे तुम्ही खालील तक्त्यामध्ये दिलेल्या बेंचमार्क स्कोअरवरून समजू शकता.

गेमिंग परफॉर्मन्स

बेंचमार्क ॲप्स सोबतच 91मोबाईल्स ने दोन्ही फोनच्या परफॉर्मन्सची चाचणी करण्यासाठी तीन वेगवेगळे मोबाईल गेम खेळले. हे तिन्ही गेम 30-30 मिनिटे खेळले गेले आणि कोणता स्मार्टफोन अधिक चांगले ग्राफिक्स देतो, कोणता कमी गरम होतो आणि कोणाची बॅटरी ड्रॉप कमी होते हे तपासले गेले आहे.

रिअल रेसिंग गेम, बीजीएमआय आणि कॉल ऑफ ड्यूटी मोबाईल गेम खेळत असताना त्याचा निकाल समोर आला की Tecno Pova 6 Neo ने बॅटल रॉयल गेममध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याचे ग्राफिक्स आणि फ्रेम रेट Infinix Note 40X पेक्षा चांगले आले आहेत आणि गेमिंग दरम्यान तो कमी गरम होतो. तर रेसिंग गेममध्ये दोघांचा प्रतिसाद सारखा होता.

बॅटरी

पॉवर बॅकअपच्या बाबतीतही Tecno Pova 6 Neo आणि Infinix Note 40X समान स्पेसिफिकेशन ला सपोर्ट करतात. यामध्ये 5,000 एमएएच ची बॅटरी दिली गेली आहे आणि ती चार्ज करण्यासाठी दोन्हीमध्ये 18 वॉट फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान मिळत आहे. 91मोबाईल्स ने चाचणी केली आहे की कोणत्या मोबाईलला चार्ज होण्यासाठी किती वेळ लागतो आणि तो कसा बॅकअप देतो. हा निकाल तुम्ही खालील तक्त्यामध्ये पाहू शकता.

किमतीची तुलना

Tecno Pova 6 Neo 5G ची किंमत

  • 6GB रॅम + 128GB मेमरी – 12,999 रुपये
  • 8GB रॅम + 256GB मेमरी – 13,999 रुपये

Techno Pova 6 Neo 5G फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. त्याच्या बेस मॉडेलमध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज दिले गेले आहे, ज्याचा दर 12,999 रुपये आहे. तर मोठा व्हेरिएंट 8 जीबी रॅमसह 256 जीबी मेमरीला सपोर्ट करतो आणि त्याची किंमत 13,999 रुपये आहे. हा नवीन टेक्नो मोबाईलला मिडनाईट शॅडो, अझूर स्काय आणि अरोरा क्लाऊड या रंगांमध्ये खरेदी करता येईल.

Infinix Note 40X 5G ची किंमत

  • 8GB रॅम + 256GB मेमरी – 14,999 रुपये
  • 12GB रॅम + 256GB मेमरी – 15,999 रुपये

Infinix Note 40X 5G फोन दोन व्हेरिएंट्समध्ये विकला जात आहे. त्याच्या 8 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे आणि 12 जीबी रॅम असलेल्या मॉडेलची किंमत 15,999 रुपये आहे. या दोन्ही व्हेरिएंट्समध्ये 256 जीबी स्टोरेज मिळत आहे. हा Infinix स्मार्टफोन पाम ब्लू आणि स्टारलिट ब्लॅक रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

मत

8GB रॅम असलेला फोन घ्यायचा असेल, तर Techno Power 6 Neo 5G फोन Infinix Note 40X 5G पेक्षा एक हजार रुपयांनी स्वस्त मिळेल. हे दोन्ही स्मार्टफोन एकाच चिपसेटवर काम करतात. इतकेच नाही तर स्पेसिफिकेशनच्या बाबतीत त्यांचा बॅक कॅमेरा, फ्रंट कॅमेरा, बॅटरी आणि चार्जिंग हे जवळपास सारखेच आहेत. फोनच्या डिस्प्लेमध्ये देखील अगदी थोड्याच इंचाचा फरक पहायला मिळत आहे.

किंमत आणि स्पेसिफिकेशन मध्ये मोठा फरक नसतानाही कामगिरीच्या बाबतीत Tecno Pova 6 Neo हा Infinix Note 40X पेक्षा किंचित पुढे जात आहे. त्याचा AnTuTu स्कोअर चांगला आहे आणि थ्रॉटलिंग परिस्थितीत हा टेक्नो मोबाईल चांगली कामगिरी करतो. जर फोनमध्ये गेम खेळण्याची आवड असेल, तर इथेही Techno Pova 6 Neo स्मार्टफोन Infinix Note 40X च्या काही पावले पुढे टाकतो.

91 मोबाईलच्या बॅटरी चाचणीत आम्हाला आश्चर्यकारक निकाल मिळाले. दोन्ही फोनमध्ये 18 वॉट चार्जिंग आणि 5,000 एमएएच ची बॅटरी आहे. परंतु असे असूनही Note 40X 5G फोनने 20 टक्क्यांपासून पूर्ण चार्ज होण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ घेतला तर Pova 6 Neo पेक्षा जवळपास पाऊण तास (46 मिनिटे) आधीच चार्ज झाला. हा फरक खरोखर मोठा आहे.

वरील तुलना वाचून आणि 91मोबाईल्स चा चाचणी अहवाल पाहून तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार कोणताही स्मार्टफोन निवडू शकता. 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये दोघेही चांगले काम करत आहेत.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here