90 दिवस वैधता आणि डेली 2GB डेटा असलेला Vi रिचार्ज लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व फायदे

Highlights

  • Vi च्या ह्या नवीन प्लॅनची किंमत 902 रुपये आहे.
  • प्लॅन कंपनीच्या साइटवर “Unlimited” टॅबमध्ये लिस्ट केला आहे.
  • प्लॅनमधील फायदे युजर्सना 3 महिन्यांसाठी मिळतील.

Vodafone Idea (Vi) गेल्या काही दिवसांपासून अनेक नवीन रिचार्ज प्लॅन्स लाँच करत आहे. आताही कंपनीनं आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलियोमध्ये एक प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन खासकरून त्या ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे, जे दीर्घ वैधतेसह इंटरनेट डेटा वापरू इच्छित आहेत. हा प्लॅन 902 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्सची संपूर्ण माहिती.

Vi 902 रुपये प्लॅनची संपूर्ण माहिती

  • नवीन Vi अनलिमिटेड रिचार्ज प्लॅनची किंमत 902 रुपये आहे आणि हा 90 दिवसांच्या वैधतेसह येतो.
  • हा कंपनीच्या साइटवर “Unlimited” टॅबमध्ये लिस्ट करण्यात आला आहे.
  • ह्यात 90 दिवस अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो.
  • प्लॅनमध्ये डेली 2GB डेटा म्हणजे एकूण 180GB डेटा यूजसाठी मिळेल. डेली डेटा कोटा संपल्यावर इंटरनेट स्पीड कमी होऊन 64Kbps होतो.
  • रिचार्जमध्ये युजर्सना रोज 100 एसएमएस देखील मिळतात, ज्यांचा वापर तुम्ही तेव्हा करू शकता जेव्हा तुमचं आवडीचं इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्यवस्थित चालत नाही किंवा इंटरनेट कनेक्शन चालत नाही.

ओटीटी सब्सक्रिप्शन फ्री

फ्री कॉलिंग, डेटा आणि एसएमएस व्यतिरिक्त युजर्सना SunNXT चं फ्री सब्सक्रिप्शन देखील दिलं जात आहे. ह्या सब्सक्रिप्शनची व्हॅलिडिटी 90 दिवस आहे. SunNXT एक Sun TV Network ची स्ट्रीमिंग सर्व्हिस आहे. Sun TV Network च्या सब्सक्रिप्शनची किंमत 480 रुपयांपासून सुरु होते. ही किंमत बेसिक सब्सक्रिप्शन प्लॅनची आहे तर प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅन 799 रुपयांमध्ये मिळतो.

Weekend Data Rollover आणि Night data बेनिफिट्स

ह्या रिचार्ज प्लॅनमध्ये Weekend Data Rollover आणि Night data बेनेफिट्स देखील मिळतात. वीकेंड डेटा रोलओव्हरमध्ये सोमवार ते शुक्रवार दरम्यान डेली डेटामधून उरलेल्या इंटरनेटचा वापर ग्राहक शनिवार व रविवारी करू शकतात.

नाइट डेटा बेनेफिट पाहता, हा प्लॅन रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान अनलिमिटिड इंटरनेट अ‍ॅक्सेस देतो. ह्या कालावधीत वापरलेला डेटा तुमच्या डेली डेटा कोटा मधून कट होत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here