सर्वांची सुट्टी करण्यासाठी मोटोरोला सज्ज! किफायतशीर किंमतीत 12GB RAM आणि 144Hz डिस्प्लेसह Moto S30 Pro लाँच

मोटोरोलनं काल टेक मंचावर तीन नवीन फोन सादर केले आहेत. यात Moto X30 Pro, Moto Razr 2022 आणि Moto S30 Pro चा समावेश आहे. हे तिन्ही मोटो स्मार्टफोन पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आले आहेत, जे सध्या चीनमध्ये आले आहेत. यातील मोटो एस30 प्रो लवकरच जागतिक बाजारात Moto Edge 30 Fusion नावानं लाँच केला जाऊ शकतो. पुढे आम्ही Moto S30 Pro च्या प्राइस व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Moto S30 Pro चे स्पेसिफिकेशन्स

मोटोरोला मोटो एस30 प्रो स्मार्टफोन कंपनीनं 6.55 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला आहे. फोनची स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी कर्व्ड आहे तसेच 144हर्ट्ज रिफ्रेश रेट व 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालतो.

Moto S30 Pro अँड्रॉइड 12 वर लाँच करण्यात आला आहे जो माययूएक्स आउट ऑफ द बॉक्सवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888प्लस चिपसेटवर चालतो. मोटोरोलानंं आपल्या या मोबाइल फोनमध्ये वीसी लिक्विड कूलिंग सिस्टम दिली आहे.

फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जोडीला 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Moto S30 Pro 5G कनेक्टिव्हिटी सपोर्टसह बाजारात आला आहे. सिक्योरिटीसाठी मोबाइल इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी 4,400एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 68वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

Moto S30 Pro ची किंमत

मोटो एस30 प्रो तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या बेस मॉडेलमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 2,199 युआन म्हणजे 26,000 रुपयांच्या आसपास आहे. तर 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज असलेला दुसरा व्हेरिएंट 2,699 युआन (जवळपास 31,900 रुपये) मध्ये विकत घेता येईल. तर 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी 2,899 युआन जवळपास 34,100 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. हा मोटोरोला फोन Black आणि Blue कलरमध्ये उपलब्ध होईल. लवकरच भारतीयांच्या सेवेत देखील हा डिवाइस सादर केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here