Realme 12x 5G फोन होणार आहे भारतात लाँच, चायना मॉडेलपेक्षा जास्त असणार याची ताकद

Realme 12x 5G फोन चीनमध्ये लाँच झाला आहे आणि आता भारतीय बाजारचे मूल्य करण्यासाठी तयार आहे. 91 मोबाईल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की लवकरच रियलमी 12 एक्स भारतात लाँच होणार आहे. इंडस्ट्री सोर्सच्या प्राप्त माहितीमध्ये हे पण समोर आले आहे की भारतात उपलब्ध होणारा Realme 12x 5G चायना मॉडेल काही वेगळे असणार आहे. या अपकमिंग रियलमी 5जी फोनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Realme 12x 5G भारतातील लाँचची माहिती

सूत्रांनुसार असे समजले आहे की एप्रिल महिन्यामध्ये रियलमी 12 एक्स 5 जी फोन भारतात लाँच होईल. सध्या कोणतीही लाँचची तारीख समोर आलेली नाही परंतु येत्या काही दिवसांमध्ये कंपनी हा फोन इंटरनेटवर टिझ करेल. अपेक्षा आहे की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात Realme 12x 5G भारतात सेलसाठी उपलब्ध होईल.

Realme 12X किंमत

चीनमध्ये रियलमी 12एक्स स्माटफोन 12जीबी रॅमवर लाँच झाला आहे ज्याच्या 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1499 युआन म्हणजे जवळपास 17,000 रुपये तसेच 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1799 युआन म्हणजे 20,000 रुपयांच्या आसपास आहे. तसेच भारतात रियलमी 12एक्स या रेंजमध्ये उपलब्ध केला जाऊ शकतो.

Realme 12X स्पेसिफिकेशन

  • 6.67″ 120Hz Screen
  • 12GB Virtual RAM
  • 12GB RAM + 512GB Memory
  • MediaTek Dimensity 6100+>
  • 50MP Dual Rear Camera
  • 45W 5,000mAh Battery

डिस्प्ले: रियलमी 12 एक्स स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा पंच-होल स्टाईल असणारा डिस्प्ले एलसीडी पॅनलवर बनला आहे जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 625 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

प्रोसेसर: Realme 12X अँड्रॉईड 14 आधारित रियलमी युआय 5.0 वर लाँच झाला आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी या मोबाईलमध्ये 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 6100+ ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.

मेमरी: हा रियलमी मोबाईल 12 जीबी रॅमला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये 12 जीबी वचुर्अल रॅम पण देण्यात आली आहे जी ​फोनच्या फिजिकल रॅमसह मिळून याला 24 जीबी रॅम (12GB+12GB RAM) ची ताकद प्रदान करतो.

कॅमेरा: फोटोग्राफीसाठी रियलमी 12एक्स मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या बॅक कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा मेन सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी: पावर बॅकअपसाठी Realme 12X स्मार्टफोन 5,000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच चीनमध्ये हा फोन 15वॉट फास्ट चार्जिंग सोबत आला आहे, परंतु भारतीय मॉडेलमध्ये 45 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.

इतर फिचर्स: रियलमी 12 एक्स स्मार्टफोनमध्ये ‘Dynamic Button’ पण दिला जाईल जो अनेक फंक्शनचा शार्टकट असणार आहे. हा मोबाईल आयपी54 रेटिंग, 3.5 एमएम जॅक आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सारख्या फिचर्सला पण सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here