12 जुलै रोजी भारतात लाँच होणार ‘रेनो 12’ ची सीरीज! येतील OPPO Reno 12 आणि OPPO Reno 12 Pro हे स्मार्टफोन

Oppo Reno 12 सीरीज भारतात लाँच होणार आहे. चीन आणि जागतिक बाजारपेठेत उपलब्ध झाल्यानंतर आता ते भारतीय बाजारपेठेकडे वळले आहेत. गेल्या आठवड्यात कंपनीने आपल्या आगामी सीरीजला टिझ केले होते. तर आज ही बातमी समोर आली आहे की, OPPO Reno 12 आणि OPPO Reno 12 Pro भारतात 12 जुलै रोजी लाँच केले जातील. OPPO भारतीय वेबसाईटवर Reno12 Series चे पेज लाईव्ह झाले आहे. जिथे लाँच होण्यापूर्वीच फोनची माहिती पाहता येईल.

OPPO Reno 12 सीरीजची भारतातील लाँचची तारीख

Oppo Reno 12 सीरीज भारतात 12 जुलै रोजी लाँच होणार आहे. द टेक आऊटलुक वेबसाईटच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. कंपनीने अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी अशी पूर्ण आशा आहे 12 जुलै रोजी OPPO Reno 12 आणि OPPO Reno 12 Pro भारतीय बाजारपेठेत प्रवेश करतील. हे दोन्ही OPPO AI फोन असतील जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील.

OPPO Reno 12 Pro चे स्पेसिफिकेशन (जागतिक)

डिस्प्ले: Oppo Reno 12 Pro हा 2412 × 1080 पिक्सेल रिझोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ कर्व्ह ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200nits पीक ब्राईटनेससह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर तंत्रज्ञान मिळते.

परफॉर्मन्स: Oppo Reno 12 Pro स्मार्टफोन अँड्रॉइड 14 आधारित ColorOS 14.1 वर काम करतो. प्रोसेसिंगसाठी यात 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनवलेले MediaTek Dimensity 7300 एनर्जी प्रोसेसर दिले आहेत. यात 12GB LPDDR4X रॅम आणि 512GB UFS 3.1 स्टोरेज मिळते.

कॅमेरा: Reno 12 Pro च्या बॅक पॅनलमध्ये 50MP Sony LYT-600 OIS सेन्सर, 8MP Sony IMX355 सेन्सर आणि 2x 50MP Samsung JN5 टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे. तर हा फोन सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP Samsung JN5 फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो.

बॅटरी: पॉवर बॅकअपसाठी Oppo Reno 12 Pro स्मार्टफोन 5000 एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी 80 वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

OPPO Reno 12 चे स्पेसिफिकेशन (जागतिक)

डिस्प्ले: Oppo Reno 12 स्मार्टफोनमध्ये 2412 × 1080 पिक्सेल रिझोल्यूशन असलेली 6.7 इंचाची FHD+ OLED स्क्रीन दिली आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 1200nits पीक ब्राईटनेस आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो.

परफॉर्मन्स: प्रोसेसिंगच्या दृष्टीने हा मोबाईल ‘प्रो’ मॉडेलसारखाच आहे. यात 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनवलेले MediaTek Dimensity 7300 एनर्जी ऑक्टाकोर प्रोसेसर देखील आहे. हा स्मार्टफोन 12GB LPDDR4X रॅम आणि 256GB UFS 3.1 स्टोरेजला सपोर्ट करतो.

कॅमेरा: फोटोग्राफीसाठी त्याच्या बॅक कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Sony LYT-600 OIS मुख्य सेन्सर, 8MP Sony IMX355 अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स दिल्या आहेत. तर हा फोन सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो.

बॅटरी: पॉवर बॅकअपसाठी Oppo Reno 12 स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएच ची बॅटरी देखील आहे, ज्यामध्ये 80 वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान उपलब्ध मिळते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here