इयरफोन्स आणि चार्जरविना येईल iPhone 12 सीरीज, किंमत पण असेल जास्त

टेक विश्वातील दिग्गज स्मार्टफोन कंपनी ऍप्पलचे फोन्स आपल्या डिजाइन, लुक आणि क्वालिटीसाठी ओळखले जातात. आता कंपनीच्या नवीन सीरीज म्हणजे iPhone 12 ची लोक प्रतीक्षा करत आहेत. अलीकडेच एक बातमी समोर आली होती कि कंपनी नवीन सीरीज मध्ये लवकरच नवीन iPhone 12 लॉन्च करणार आहे. पण आता अजून एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामुळे आयफोन 12 ची वाट बघत असलेल्या फॅन्सना धक्का बसू शकतो. या सीरीज संबंधित नवीन लीक ट्रेंडफोर्सच्या वेबसाइट वर समोर आली आहे, ज्यानुसार कंपनी आपली 2020 लाइनअप विना ऍक्सेसरीज लॉन्च करेल. इतकेच नव्हे तर या सीरीजचे डिवाइस iPhone 11 सीरीज पेक्षा महाग असतील.

रिपोर्टनुसार ऍप्पल आयफोन 12 सीरीज मध्ये येणाऱ्या स्मार्टफोन्सच्या रिटेल बॉक्स मध्ये चार्जर दिला जाणार नाही. आयफोन 12 सीरीज विना ऍक्सेसरीज येणार असल्याची माहिती आधी पण अनेकदा समोर आली आहे. पण अधिकृतपणे याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. काही रिपोर्ट्सच्या मते कंपनी आयफोन 12 सीरीजसाठी वेगळा 20 वॉटचा चार्जर ऑफर करेल.

किंमत

आयफोनच्या विना ऍक्सेसरीज येण्याच्या बातमी व्यतिरिक्त रिपोर्ट मध्ये चार अपेक्षित iPhone 12 मॉडेलची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पण देण्यात आली आहे. या रिपोर्ट नुसार कंपनी नवीन सीरीज मध्ये iPhone 12, iPhone 12 Max, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max सादर करेल. तसेच iPhone 12 ची किंमत $699 (जवळपास 51,200 रुपये) आणि 749 डॉलर (जवळपास 54,800 रुपये) दरम्यान असू शकते, iPhone 12 Max ची किंमत $ 799 (जवळपास 58,500 रुपये) आणि 849 डॉलर (जवळपास 62,200 रुपये) दरम्यान असू शकते.

iPhone 12 Pro ची किंमत $ 1,049 (जवळपास 76,800 रुपये) आणि $ 1,099 (जवळपास 80,500 रुपये) दरम्यान असू शकते आणि iPhone 12 Pro Max ची किंमत $ 1,149 (जवळपास 84,100 रुपये) ते $ 1,199 (जवळपास 87,800 रुपये) दरम्यान असू शकते.

iPhone 12 सीरीज महाग असल्याचा अंदाज आधीच लावला जात होता कारण यात 5G कनेक्टिविटी सह अजून अनेक खास फीचर मिळू शकतात. ऍप्पलने सांगितले आहे कि ते आयफोन 12 सीरीजच्या किंमती कमी कमी ठेवण्याचा प्रयत्न करतील.

स्पेसिफिकेशन्स

रिपोर्ट मध्ये iPhone 12 सीरीजच्या स्मार्टफोन्सच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती पण समोर आली आहे. सीरीजचे सर्व मॉडेल्स AMOLED डिस्प्ले, A14 SoC आणि फेस आईडी सह सादर केले जाऊ शकतात. तसेच iPhone 12 आणि iPhone 12 Max 4GB LPDDR4X रॅम आणि डुअल रियर कॅमेरा सेटअप सह सादर केले जाऊ शकतात. या फोन्सच्या कॅमेरा सेटअप मध्ये दोन 12-मेगापिक्सेलचे सेंसर असतील. iPhone 12 प्रो आणि iPhone 12 प्रो मॅक्स 6GB LPDDR4X रॅम सह येण्याची शक्यता आहे. यात तीन 12-मेगापिक्सल सेंसर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here