2 डिसेंबरला येतोय iQOO Neo 7 SE; कंपनीनं केली घोषणा

2 डिसेंबरला आयकू ब्रँड आपली नवीन iQOO 11 series टेक मंचावर सादर करणार आहे. या सीरीज अंतगर्त iQOO 11 5G आणि iQOO 11 Pro 5G फोन लाँच होतील. तसेच आता कंपनीनं घोषणा केली आहे की आयकू नियो सीरीजचा आगामी स्मार्टफोन iQOO Neo 7 SE देखील 2 डिसेंबरला लाँच होईल. हा प्रीमियम मोबाइल फोन MediaTek Dimensity 8200 SoC चिपसेटसह येऊ शकतो तसेच या नव्या आयकू मोबाइलमध्ये अनेक दमदार स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात.

iQOO Neo 7 SE ची लाँच डेट

आयकू कंपनीनं आपल्या नियो सीरीजच्या आगामी स्मार्टफोन आयकू नियो 7 एसईच्या लाँच डेटची घोषणा करत सांगितलं आहे की हा मोबाइल फोन 2 डिसेंबरला लाँच होईल. iQOO Neo 7 SE चा लाँच इव्हेंट 2 डिसेंबरला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 2 डिसेंबरला आयकू नियो 7 एसई सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होईल नंतर अन्य बाजारांमध्ये एंट्री घेईल. लाँच डेट अनाउंस करताना कंपनीनं अधिकृतपणे सांगितलं आहे की iQOO Neo 7 SE मीडियाटेक डिमेनसिटी 8200 चिपसेटवर चालेल. हे देखील वाचा: OTT Release This Week: ऑस्करला जाणारा भारतीय चित्रपट आला ओटीटीवर; या आठवड्यात पाहा हे चित्रपट आणि वेबसीरीज

iQOO Neo 7 SE चे लीक स्पेसिफिकेशन्स

विविध लीक्समध्ये समोर आलेले डिटेल्स पाहता आयकू नियो 7 एसई स्मार्टफोन 12 जीबी रॅमवर लाँच होऊ शकतो तसेच 512 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. त्याचबरोबर या मोबाइल फोनचे 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट तसेच 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट देखील बाजारात येऊ शकतात. कंपनीनं मीडियाटेक डिमेनसिटी 8200 चिपसेटची माहिती दिली आहे. हा प्रोसेसर 5जी बँड्सना सपोर्ट करू शकतो.

iQoo Neo 7 SE स्मार्टफोन ग्लॉस पॅनलवर बनला असेल ज्यात पंच-होल स्टाइल अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिली जाऊ शकतो. लीकनुसार याची स्क्रीन साईज 6.78 इंच असू शकते. तसेच फोटोग्राफीसाठी आयकू नियो 7 एसई मध्ये 50 मेेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी iQoo Neo 7 SE मध्ये 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी असल्याचं देखील लीकयामध्ये सांगण्यात आलं आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here