OTT Release This Week: ऑस्करला जाणारा भारतीय चित्रपट आला ओटीटीवर; या आठवड्यात पाहा हे चित्रपट आणि वेबसीरीज

पुन्हा एकदा तुमच्या आवडीच्या OTT platforms वर नवीन कंटेंट वर्षाव झाला आहे. दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यात देखील वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अ‍ॅक्शन, ड्रामा रोमान्स आणि मिस्ट्रीचा भरणा असलेले अनेक चित्रपट, वेब सीरीज व वेब शो रिलीज होणार आहेत, ज्यामुळे तुमची तुमचा Weekend आणखी शानदार बनवू शकता. जर तुम्हाला OTT वर या आठवड्यात रिलीज होणाऱ्या नवीन चित्रपट व वेब सीरीजची माहिती हवी असेल तर या आर्टिकलची मदत होऊ शकते. या आठवड्यात Kantara पासून Girls Hostel 3.0, Khakee, Chup, Wednesday सारखे शानदार सीरीज व चित्रपट आले आहेत, जे तुम्ही Disney Plus Hotstar, Netflix, आणि Amazon Prime Video सारख्या प्लॅटफॉर्मवर बघू शकता.

OTT releases this week

  • Kantara
  • Khakee: The Bihar Chapter
  • Girls Hostel 3.0
  • Chup: Revenge of the Artist
  • Last Film Show (Chhello Show)

Kantara

मोठ्या पडद्यावर विक्रमी कमाई करणारा कन्नड अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट Kantara अखेरीस ओटीटीवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम करता येईल. प्राइम व्हिडीओवर चित्रपट हिंदीत रिलीज झाला नाही तर Kannada, Malayalam, Tamil आणि Telugu मध्ये बघता येईल. हा चित्रपट ऋषभ शेट्टी यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे, तसेच ऋषभनं शिवा नावाच्या मुख्य पात्राची भूमिका देखील साकारली आहे. हे देखील वाचा: VIDEO: MS Dhoni नं खरेदी केली ‘ही’ इलेक्ट्रिक कार; फीचर्स ऐकून तुम्ही देखील व्हाल फॅन

Khakee: The Bihar Chapter

अ‍ॅक्शनचा भरणा असेलल्या क्राइम ड्रामा सीरीजची आवड असणाऱ्या दर्शकांसाठी खुशखबर आहे कारण नेटफ्लिक्सवर ‘खाकी: द बिहार चॅप्टर’ रिलीज झाली आहे. ही सीरीज नीरज पांडे द्वारे लिखित आणि निर्मित आहे. सीरीज कॉप-क्रिमिनल ड्रामावर आधारित आहे. परंतु यात अ‍ॅक्शन, ड्रामासह अनेक ट्विस्ट आणि टर्न आहेत. सीरीजमध्ये Karan Tacker, Avinash Tiwary, Abhimanyu Singh, Jatin Sarna, Ravi Kishan, Ashutosh Rana, Nikita Dutta, Aishwarya Sushmita, Anup Soni, Kali Prasad Mukherjee आणि Shraddha Das सारख्या कलाकारांचा समावेश आहे.

Girls Hostel 3.0

बहुचर्चित वेबसीरीज Girls Hostel पुन्हा एकदा तिसरा सीजन घेऊन परतली आहे. या सीरीजचा तिसरा सीजन सोन लिववर स्ट्रीम करता येईल. ही कॉमेडी-ड्रामा सीरज आणि अधिक मजेदार असेल. तसेच यात अनेक ट्विस्ट आणि टर्न असतील. यावेळी गर्ल्स हॉस्टल 3.0 मध्ये मुलींचा एक गट टॅलेंट शो आयोजित करण्याची योजना बनवत आहे. परंतु त्यांना विरोध होतो, ज्यामुळे शो रद्द करावा लागतो.

Chup: Revenge of the Artist

आर. बाल्की यांचा चित्रपट ‘चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट’ काही दिवसांपूर्वी मोठ्या पडद्यावर रिलीज झाला होता. आता हा चित्रपट झी5 वर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटात मुंबईमधील एका सीरियल किलरची गोष्ट दाखवण्यात आली आहे, जो बेमान चित्रपट समीक्षकांना लक्ष्य करत आहे. या सायको थ्रिलर चित्रपटात Sunny Deol, Dulquer Salmaan, Shreya Dhanwanthary, Saranya Ponvannan, Pooja Bhatt आणि Amitabh Bachchan सारखे कलाकार आहेत. हे देखील वाचा: 12 हजारांच्या बजेटमध्ये दमदार 5G Phone; 6000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह येतोय Infinix Hot 20 5G

Last Film Show (Chhello Show)

95 व्या ऑस्करमध्ये ‘लास्ट फिल्म शो (छेल्लो शो)’ ला सर्वोत्कृष्ट अंतर्राष्ट्रीय फीचर फिल्मसाठी भारताकडून अधिकृतपणे निवडण्यात आलं होतं. हा गुजराती चित्रपट समय (भाविन रबारी) नावाच्या एका 9 वर्षांच्या मुलाची गोष्ट सांगतो, जो छलाला नावाच्या एका छोट्या गावात राहतो जे गुजरातमध्ये आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here