Redmi Note 11T 5G ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर डिस्काउंटसह उपलब्ध; जाणून घ्या ऑफर

शाओमी आपल्या सब-ब्रँड रेडमीच्या नोट सीरिज अंतर्गत फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्स स्वस्तात देण्याचे प्रयत्न करते. आता रेडमी नोट 12 सीरिज जागतिक बाजारात आली आहे, जी लवकरच भारतात येईल. त्यामुळे जुना Redmi Note 11T 5G स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर डिस्काउंटसह विकला जात आहे. हा फोन 5G सपोर्ट, 128GB स्टोरेज, 6GB रॅम, मीडियाटेक Dimensity 810 5G प्रोसेसर आणि 33W Pro Fast चार्जिंगसह लाँच झाला आहे. रेडमीचा हा फोन अ‍ॅमेझॉनवर 14 टक्के डिस्काउंटसह 17,999 रुपयांची प्रारंभिक किंमतीत लिस्ट आहे. परंतु बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरमुळे याची किंमत आणखी कमी होईल.

Redmi Note 11T 5G वरील डिस्काउंट आणि ऑफर

Amazon वर Redmi Note 11T 5G स्मार्टफोन 17,999 रुपयांमध्ये लिस्ट आहेत. या फोनवर सध्या 14% डिस्काउंट मिळत आहे, त्यामुळे फोनची किंमत 3,000 रुपयांनी कमी झाली आहे. अ‍ॅमेझॉनवर हा फोन नो कॉस्ट ईएमआयवर देखील विकत घेता येईल, जो 860 रुपये दरमहा इतका आहे. तसेच रेडमीच्या या फोनच्या बदल्यात जुना फोन एक्सचेंज केल्यास आणखी सूट मिळवता येईल. परंतु एक्सचेंज डिस्काउंट तुमच्या पुराने फोनच्या व्हॅल्यू आणि कंडीशनवर अवलंबुन असते. हे देखील वाचा: आयफोनलाही टक्कर देईल असा Xiaomi चा सर्वात शक्तिशाली फोन; उच्च दर्जाच्या प्रोसेसर आणि कॅमेरा

अ‍ॅमेझॉनवर Redmi Note 11T 5G वर अनेक बँक डिस्काउंट मिळत आहेत. HDFC बँक क्रेडिट कार्डवर 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तर इंडसइंड बँक क्रेडिट कार्डवर EMI ट्रँजॅक्शन वर 7.5 टक्के (1500 रुपयांपर्यंत) डिस्काउंट मिळत आहे. Kotak बँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर EMI ट्रँजॅक्शनवर 7.5 टक्के सूट आहे.

Yes Bank क्रेडिट कार्डच्या EMI ट्रँजॅक्शनवर 7.5 टक्के (2000 रुपयांपर्यंत) डिस्काउंट मिळत आहे. HSBC च्या क्रेडिट कार्डवर 250 रुपये पर्यंतचा कॅशबॅक मिळत आहे. Amazon Pay च्या माध्यमातून UPI ट्रँजॅक्शन केल्यास 50 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. तसेच हा फोन खरेदी केल्यास दोन महिन्यांसाठी YouTube Premium सब्सक्रिप्शन मोफत मिळेल.

Redmi Note 11T 5G चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 11T 5G स्मार्टफोनमध्ये MediaTek MT6833P Dimensity 810 प्रोसेसर देण्यात आला आहे. रेडमीचा हा फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित MIUI 12.5 कस्टम युजर इंटरफेस वर चालतो. या फोनमध्ये 6.6-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्क्रीनला Corning Gorilla Glass 3 चे प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. हे देखील वाचा: तुमचं स्वतःचं YouTube चॅनेल कसं बनवायचं, जाणून घ्या सोपी पद्धत

Redmi Note 11T 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा वाइड सेन्सर आहे आणि जोडीला 8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा सेन्सर मिळतो. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप आणि कंपास सारखे सेन्सर मिळतात. तसेच पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here