Tata Nano पुन्हा येऊ शकते बाजारात; कंपनीनं मात्र कोणतीही माहिती दिली नाही

Tata Motors इलेक्ट्रिक बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी तयारी करत आहे. रिपोर्ट्सनुसार कंपनी Tata Nano EV मार्केटमध्ये सादर करू शकते. तुम्हाला आठवत असेल की Ratan Tata यांनी सर्वसामान्य भारतीयांचं कारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी Tata Nano भारतीय बाजारात लाँच केली होती. परंतु यावेळी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड मार्केटमध्ये टाटा नॅनो एंट्री-लेव्हल ईव्ही म्हणून सादर करू शकते. याबाबत कंपनीनं कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिली नाही.

Tata Nano EV लवकरच होऊ शकते लाँच

मीडिया रिपोर्टनुसार स्वदेशी वाहन निर्माता कंपनी Tata Nano (टाटा नॅनो) इलेक्ट्रिक पावरट्रेनसह पुन्हा सादर करू शकते. तसेच Tata Nano EV (टाटा नॅनो ईवी) चे मेकॅनिकल डिटेल्स, सस्पेंशन सेटअप आणि टायर्समध्ये महत्वाचा बदल दिसू शकतो. तसेच रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की जर टाटा नॅनो ईव्हीची योजना प्रोडक्शन पर्यंत पोहोचली आहे. तसेच कार निर्माता कंपनी मराईमलाईनगरमध्ये फोर्ड प्लांटच्या अधिग्रहणा संबंधित तामिळनाडु सरकारशी बोलणी पुन्हा सुरु करू शकते. परंतु पुन्हा एकदा सांगू इच्छितो की टाटा नॅनो इलेक्ट्रिक कार संबंधित कंपनीनं सध्या कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. हे देखील वाचा: 2999 रुपयांमध्ये आला स्वस्त 4जी फोन; जियोफोनला टक्कर देण्यासाठी Dual 4G VoLTE सह Hotspot फीचरही

बाजारात आधीपासून Tata Nano EV उपलब्ध!

विशेष म्हणजे Tata Nano EV कस्टम वन-ऑफ प्रोजेक्ट स्वरूपात आधीपासून उपलब्ध आहे. टाटा नॅनो ईव्हीचा सिंगल कस्टम यूनिट इलेक्ट्रा ईव्हीद्वारे रतन टाटा यांना भेट करण्यात आली आहे. रतन टाटा ईव्ही स्टार्टअप इलेक्ट्रा ईव्हीच्या प्रारंभिक संस्थपाक आणि गुंतवणूकदार आहेत. कस्टम नॅनो EV 72V EV आर्किटेक्चरवर आधारित आहे आणि यात कस्टम रेड इंटीरियर्स आहेत. तसेच, टाटा नॅनो ईव्हीमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर बंगळुरूच्या रस्त्यांवर ही कार चालत आहे.

Tiago EV

Tiago EV कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे, जिची किंमत 8.5 लाखांपासून सुरु होते. टाटा टियागो ईव्ही टाटाची जिपट्रॉन टेक्नॉलॉजीसह येते आणि यात दोन बॅटरी पॅक ऑप्शन मिळतात. छोटा बॅटरी पॅक 19.4kWh चा आहे तर मोठा बॅटरी पॅक 24kWh चा आहे. तसेच 19.4kWh बॅटरी पॅक असलेल्या Tata Tiago EV मध्ये 250km ची रेंज अपेक्षित आहे. तर MIDC नुसार मोठी बॅटरीमधून 315km ची रेंज मिळेल. Tiago EV पॉवरट्रेन (बॅटरी आणि मोटर) IP67 सर्टिफाइड आहेत.

Cheapest electric car tata tiago ev launched price Sale availability specs range

टाटा नुसार फक्त 5.7 सेकंदात ही कार ताशी 60 किमीचा वेग पकडू शकते. Tiago EV मध्ये 15A घरगुती सॉकेट, एक 3.3kW AC होम चार्जर, एक 7.2kWh एसी होम चार्जर आणि एक DC फास्ट चार्जर असे चार चार्जिंग ऑप्शन मिळतात. यातील 7.2kW चा फास्ट चार्जर Tiago EV फक्त 3 तास 36 मिनिटांत पूर्णपणे चार्ज करेल. तर DC चार्जर फक्त 57 मिनिटांत 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्जिंग देईल. हे देखील वाचा: 11 हजारांच्या बजेटमध्ये Redmi चा 5G Phone! बंपर डिस्काउंटसह Redmi 11 Prime 5G उपलब्ध

टाटा टियागो ईव्ही मल्टी-लेव्हल रीजनरेटिव ब्रेकिंग, क्रूज कंट्रोल आणि स्पोर्ट्स मोडसह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये व्हाइट लेदरेट सीट्स, ऑटो क्लायमेट कंट्रोल, रेन-सेंसिंग वाइपर, ऑटो हेडलॅम्प, पावर विंडो, कूल्ड ग्लव बॉक्स, पुश बटन स्टार्ट स्टॉप, रियर वॉश वाइप्स आणि डिफॉगर, फॉग लॅम्प, एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर सारखे प्रीमियम फीचर्सचा देखील समावेश आहे. तसेच यात हेडलॅम्प, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅप्पल कारप्लेसह एक हरमन सोर्स टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आणि 8 स्पिकर सिस्टम मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here