कंपनीने Realme ‘P’ सीरीज सुरू करून एप्रिल महिन्यात Realme P1 5G आणि Realme P1 Pro 5G हे दोन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केले होते. हे मोबाईल मिड बजेट सेगमेंटमध्ये आणण्यात आले होते. आता ‘प्रो’ मॉडेलला आणखी शक्तिशाली बनवत कंपनीने Realme P1 Pro चे 12GB रॅम मॉडेल देखील लाँच केले आहे.
Realme P1 Pro 5G फोटो
Realme P1 Pro 5G
- 8GB रॅम + 128GB स्टोरेज = ₹19,999
- 8GB रॅम + 256GB स्टोरेज = ₹20,999
- 12GB रॅम + 256GB स्टोरेज = ₹22,999
Realme P1 Pro 5G फोन 8GB रॅम सह लाँच करण्यात आला होता जो 128GB आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करत होता. पण आता कंपनीने या स्मार्टफोनचा 12GB रॅम व्हेरिएंट देखील सादर केला आहे. या नवीन व्हेरिएंट मध्ये 256GB स्टोरेज मिळत आहे आणि त्याची किंमत 22,999 रुपये आहे. तर 8GB + 128GB हे 19,999 रुपयांना आणि 8GB + 256GB 20,999 रुपयांना विकले जात आहे. हा फोन फिनिक्स रेड आणि पॅरोट ब्लू कलरमध्ये खरेदी करता येईल.
Realme P1 Pro 5G चे स्पेसिफिकेशन
डिस्प्ले: Realme P1 Pro 5G मध्ये 2412 X 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7 इंचाची फुलएचडी + स्क्रीन दिली गेली आहे. हा एक कर्व्ह डिस्प्ले आहे, जो ओएलईडी पॅनेलवर बनवला आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट, 950nits ब्राईटनेस आणि 2160Hz पीडब्लूएम डिमिंग मिळते.
प्रोसेसर: Realme P1 Pro 5G फोन 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार केलेल्या Qualcomm Snapdragon 6 Gen 1 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच करण्यात आला आहे. जो 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडने रन करतो. यात हेवी गेमिंग आणि मल्टी-टास्किंगसाठी 3D VC कूलिंग सिस्टम देखील आहे.
कॅमेरा: फोटोग्राफीसाठी हा ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर, F/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल OIS सेन्सर आणि F/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सेल पोर्ट्रेट लेन्स आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
बॅटरी: Realme P1 Pro 5G फोन पॉवर बॅकअपसाठी 5000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी 45 वॉट फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे. या फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग देखील उपलब्ध आहे.
ओएस: Realme P1 5G स्मार्टफोन Android 14 वर लाँच करण्यात आला आहे जो Realme UI 5.0 सह कार्य करतो. कंपनी हा फोन 4 जनरेशन अँड्रॉईड सॉफ्टवेअर अपडेट आणि 3 वर्षांच्या सिक्युरिटी अपडेटसह विकत आहे.
इतर फिचर्स: या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनमध्ये Rainwater Smart Touch फिचर आहे. मोबाईलमध्ये 3.5mm हेडफोन जॅक देखील उपलब्ध आहे.















