OnePlus 9 च्या लॉन्चच्याआधी जाणून घ्या कोणत्या फीचर्ससह येईल हा पावरफुल फोन

प्रीमियम स्मार्टफोन बनवणारी कंपनी OnePlus च्या अपकमिंग फ्लॅगशिप सीरीज OnePlus 9 बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. आशा आहे कि या सीरीज अंतगर्त OnePlus 9, OnePlus 9 Pro आणि OnePlus 9 Lite फोन सादर केला जाऊ शकतो. दुसरीकडे ऑफिशियल होण्याआधी या तिन्ही फोन्सच्या स्पेसिफिकेशनची माहिती लीक झाली आहे. या सीरीजच्या OnePlus 9 चे स्पेसिफिकेशन्स पुन्हा एकदा लीक झाले आहेत. टिपस्टर AIDA64 ने बेंचमार्किंग साॉफ्टवेयर स्क्रीनशॉटच्या माध्यमातून OnePlus 9 च्या स्पेसिफिकेशन्स बाबत माहिती दिली आहे. (oneplus 9 series specifications leak snapdragon 888 65w 48mp camera)

OnePlus 9 मध्ये असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

TechDroider च्या स्क्रीनशॉट नुसार OnePlus 9 मध्ये 6.55-inch फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले असेल जो 402ppi पिक्सल डेंसिटी आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. तसेच फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 SoC (lahaina) सह Adreno 660 जीपीयू दिला जाईल. रिपोर्टनुसार OnePlus 9 मध्ये 8GB रॅम आणि 128जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते.

हे देखील वाचा : वेबसाइटवर लिस्ट झाला मिड-रेंज फ्लॅगशिप फोन Motorola G100, समोर आले दमदार फीचर्स

फोटोग्राफीसाठी OnePlus 9 मध्ये 12 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 4,500mAh बॅटरी दिली जाऊ शकते जो 65W फास्ट चार्जिंग असेल. तसेच सांगण्यात आले आहे कि OnePlus 9 फोन 8K रेकॉर्डिंग 30fps आणि वायरलेस चार्जिंगसह येईल.

OnePlus 9 बाबत माहिती समोर येण्याची हि काही पहिली वेळ नाही. याआधी पण फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले होते. आधी समोर आलेल्या लीकनुसार OnePlus 9 मध्ये 8GB / 12GB रॅम आणि 256GBGB इंटरनल स्टोरेज मिळू शकते तसेच हा फोन ऑक्सीजनओएस आधारित अँड्रॉइड 11 वर काम करेल. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,500mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह दिली जाऊ शकते. रिपोर्टनुसार OnePlus 9 मध्ये वर्टिकल लाइनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. या सेटअपमध्ये 50MP चा प्राइमरी वाइड-अँगल सेंसर (f / 1.79) दिला जाईल.

तसेच f/1.8 अपर्चर सह 20 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेंस आणि ऑटोफोकस फीचरसह तिसरा कॅमेरा 12 मेगापिक्सलचा असेल. याआधी बातमी समोर आली होती कि वनप्लस 9 सीरीजच्या कॅमेरामध्ये Leica लेंस असेल, त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता कि पिक्चर क्वॉलिटीच्या बाबतीत वनप्लस 9 सीरीजचे स्मार्टफोन्स खूप शानदार असतील. तसेच, काही लीक्स मध्ये OnePlus 9 मध्ये 48MP ट्रिपल कॅमेरा सेटअप असल्याचे पण समोर आले आहे.

हे देखील वाचा : डुअल सेल्फी आणि जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेला Vivo S9 घेईल 3 मार्चला एंट्री, लॉन्चच्याआधी जाणून घ्या सर्वकाही

कधी होतील लॉन्च

या तीन डिवाइसेसबाबत गेल्या अनेक दिवसांपासून लीक्स समोर येत आहेत. अश्या बातम्या आहेत कि हे डिवाइसेस मार्च मध्ये लॉन्च केले जाऊ शकतात. कंपनीने आतापर्यंत वनप्लस 9 सीरीजबद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. पण, बोलले जात आहे कि लवकरच कंपनी याबाबत अधिकृत घोषणा करणार आहे.

वनप्लस 9 प्रो व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here