4 डिसेंबरला चीनमध्ये लाँच होईल OnePlus 12, OnePlus Ace 3 पण असू शकतो

वनप्लस टेक मार्केटमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. आपण बोलत आहोत OnePlus 12 स्मार्टफोनबद्दल. OnePlus 12 स्मार्टफोला चीनमध्ये 4 डिसेंबरला लाँच केला जात आहे. कंपनीनं चिनी सोशल मीडिया साइट Weibo वर माहिती दिली आहे. तसेच, लाँचिंगच्या अगोदर कंपनी फोनच्या कॅमेरा स्पेक्ससाठी एक इव्हेंट आयोजित करत आहे. हा इव्हेंट 9 नोव्हेंबरसाठी शेड्यूल झाला आहे.

10 वर्षाचा झाला वनप्लस ब्रँड

कंपनी 10 व्या वर्धापनदिनानिम्मित OnePlus 12 ला टेक बाजारात सादर करणार आहे. ज्या लोकांना माहित नाही त्यांच्यासाठी वनप्लसची स्थापना 14 अक्टूबर, 2012 ला झाली होती. 16 जून, 2021 ला, ओप्पोने वनप्लस सह आपल्या विलिनीकरणची घोषणा केली, ज्यानंतर वनप्लस आणि ओप्पोच्या छत्रछायेखाली एक स्वतंत्र ब्रँडच्या रूपामध्ये काम करणे सुरु केले. चला एक नजर टाकूया वनप्लस 12 मध्ये काय मिळू शकते.

OnePlus 12 स्पेसिफिकेशन्स (लीक)

वनप्लस 12 स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेटसह असणार आहे. ब्रँडने पहिल्यांदा याबाबत पुष्टि केलेली आहे, याचा रिअर कॅमेरा सेटअप हायपरटोन कॅमेरा ऑप्टिमाइजेशन सह LYT-T808 मुख्य कॅमेरा सेन्सर द्वारे हेडलाइन केला जाईल. रिपोर्ट्सच्या मते, प्रायमरी कॅमेरा 48-मेगापिक्सल IMX581 अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 64-मेगापिक्सल ओमनीव्हिजन OV64B पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा 3x ऑप्टिकल झूम सोबत येईल. सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

तसेच रिपोर्ट्स मते, वनप्लस 12 मध्ये 6.82 इंचाचा BOE X1 OLED डिस्प्ले असेल जो 2K रेजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. तसेच ColorOS 14-आधारित Android 14 वर चालतो.
वनप्लस 12 च्या हाई कॉन्फिगरेशन व्हेरिएंटमध्ये 16 जीबी LPDDR5x रॅम आणि 1 टीबी UFS 4.0 स्टोरेज असण्याची शक्यता आहे. यात 5400mAh ची बॅटरी असू शकते. जी 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करू शकते.

वनप्लस एस 3 पण होऊ शकतो लाँच

वनप्लस 4 डिसेंबरला वनप्लस 12 सह स्नॅपड्रॅगन 8 जेन 2-संचालित वनप्लस एस 3 ला सादर करु शकतात. तसेच कंपनी काही दिवसांमध्ये यावर अधिकृत पुष्टि करणार आहे. रिपोर्ट्सच्या मते, वनप्लस 12 जानेवारी मध्ये वैश्विक बाजारात येईल. अनुमान केले जात आहे की एस 3 ला जागतिक बाजारात वनप्लस १२आरच्या रूपामध्ये रिब्रँड केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here