Vivo V40 लाँचच्या आधी 5,600 रुपये स्वस्त विकला जात आहे Vivo V30 5G फोन

विवो वी 40 सीरीज 7 ऑगस्टला भारतात सादर होईल. यानुसार Vivo V40 आणि Vivo V40 Pro स्मार्टफोन लाँच होतील. या नवीन मोबाईल फोनच्या मार्केटमध्ये येण्याच्या आधी कंपनीने आपल्या Vivo V30 5G फोनच्या किंमतीत कपात केली आहे. या विवो फोनच्या किंमतीत 2,000 रुपयांची किंमत कपात झाली आहे तसेच त्याचबरोबर 3,600 रुपये पर्यंतचा डिस्काऊंट पण दिला जात आहे. म्हणजे विवो वी 40 भारतातील लाँचच्या आधी विवो वी30 5,600 रुपये स्वस्त (₹2000+₹3600) मिळत आहे.

विवो वी30 5जी फोन तीन व्हेरिएंट मध्ये लाँच झाला होता ज्याच्या 8 जीबी रॅम असणाऱ्या 128 जीबी मे​मोरी व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये तसेच 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपये होती. या दोन्ही व्हेरिएंटची किंमत कमी होऊन 31,999 रुपये आणि 33,999 रुपये झाली आहे. तसेच 37,999 रुपयांमध्ये लाँच झालेल्या 12 जीबी+256 जीबी व्हेरिएंटची किंमत 2000 रुपये कमी होऊन 35,999 रुपये झाली आहे.

कंपनीच्या अधिकृत वेबसाईट विवो डॉट इनवर हा स्मार्टफोन बँक कार्ड डिस्काऊंटसह पण विकला जात आहे. Vivo V30 5G 8+128 व्हेरिएंटवर 3,200 रुपयांची सूट मिळत आहे तसेच 8+256 वर 3,400 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. या फोनच्या सर्वात मोठ्या मॉडेल 12+256 वर 3,600 रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. या डिस्काऊंट ऑफर 31 ऑगस्ट पर्यंत चालेल ज्याचा लाभ घेण्यासाठी HDFC, SBI आणि ICICI Credit/Debit Card च्या माध्यमातून पेमेंट करावे लागेल.

Vivo V30 5G चे स्पेसिफिकेशन

  • 6.78 इंचाचा 120 हर्ट्स अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 प्रोसेसर
  • 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज
  • 50 मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरा
  • 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
  • 80 वॉट फास्ट चार्जिंग
  • 5,000 एमएएच बॅटरी

डिस्प्ले : Vivo V30 2800 x 1260 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.78 इंचाच्या एचडीप्लस डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही अ‍ॅमोलेड स्क्रीन आहे ज्यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि 2800 निट्स पीक ब्राईटनेस काला सपोर्ट मिळतो.

परफॉर्मन्स : हा फोन अँड्रॉईड 14 आधारित फन टच ओएस 14 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 चिपसेट देण्यात आली आहे जो 2.63GHz पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करू शकते.

मेमरी : विवो वी 30 5 जी फोन 8 जीबी रॅम आणि 12 जीबी रॅमला सपोर्ट करतो. या मोबाईलमध्ये 12 जीबी रॅम एक्सपांशन टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जो फोनच्या फिजिकल रॅमसह मिळून याला 24 जीबी रॅम पर्यंतची पावर प्रदान करते.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी Vivo V30 5G ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करते. याच्या बॅक पॅनलवर OIS फिचर असलेला 50 मेगापिक्सल मेन सेन्सर तसेच 50 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा ​मिळतो.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5,000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी विवो वी 30 मध्ये 80 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here