मीडियाटेक प्रोसेसरसह Redmi A2 होऊ शकतो ग्लोबली लाँच; टिपस्टरनी दिली माहिती

Highlights

  • MediaTek Helio G36 चिपसेटवर आधारित Redmi A2 येऊ शकतो
  • फोनमध्ये 2GB RAM आणि 32GB स्टोरेज मिळू शकते.
  • ड्युअल कॅमेरा सेन्सरसह होऊ शकते Redmi A2 ची एंट्री

Xiaomi आपल्या सबब्रँड Redmi अंतर्गत एक नवीन एंट्री लेव्हल स्मार्टफोन सीरिज सुरु केली आहे. गेल्यावर्षी या ए सीरिज अंतर्गत कंपनीनं Redmi A1 आणि Redmi A1+ असे दोन मॉडेल सादर केले होते. आता या बजेट सेग्मेंटमध्ये नवीन मॉडेल आणण्याची तयारी कंपनी करत आहे. कंपनी लवकरच आपला नवीन मॉडेल Redmi A2 ग्लोबली लाँच करू शकते. परंतु फोनच्या लाँचपूर्वीच 91मोबाइल्सला या डिवाइसची एक्सलूसिव्ह इमेज सोबतच फुल स्पेसिफिकेशन आणि प्राइस मिळाली आहे. आम्हाला हे माहिती भारतातील प्रमुख टिप्सटर सुधांशुच्या माध्यमातून मिळाली आहे की हा फोन MediaTek Helio G36 चिपसेटसह येऊ शकतो.

रेडमी ए2 चे लीक स्पेसिफिकेशन

मिळालेल्या माहितीनुसार हा फोन MediaTek Helio G36 चिपसेटवर आधारित असू शकतो आणि यात तुम्हाला 2 जीबी रॅमसह 32जीबी स्टोरेज मिळू शकते. हा फोन युरोपमध्ये 109 युरोमध्ये सादर केला जाऊ शकतो असं देखील सुधांशुनं सांगितलं आहे. ही किंमत भारतीय करन्सीनुसार सुमारे 9,600 रुपये आहे, परंतु भारतीय बाजारात हा फोन यापेक्षा कमी किंमतीत सादर केला जाऊ शकतो.

वर सांगितल्याप्रमाणे हा कंपनीचा बजेट फोन असू शकतो. त्यामुळे तुम्हाला साधारण स्पेसिफिकेशन मिळू शकतात. आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार, Redmi A2 मध्ये तुम्हाला 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.52 इंचाची आयपीएस एलसीडी स्क्रीन मिळू शकते. तसेच फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की फ्रंटला वॉटर ड्रॉप नॉच कट आउटसह सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.

शाओमी रेडमी ए2 मध्ये तुम्हाला ड्युअल रियर कॅमेरा मिळू शकतो. ज्यात मेन सेन्सर 8MP चा AI सपोर्टसह मिळू शकतो. परंतु दुसऱ्या सेन्सरची माहिती अद्याप हाती लागली नाही. तसेच फ्रंटला 8MP एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: यापेक्षा स्वस्तात मिळणार नाही 5000mAh Battery आणि 6GB RAM; Tecno Pop 7 Pro ची भारतात एंट्री

Redmi A1 Specifications

  • 6.52″ HD+ डिस्प्ले
  • MediaTek Helio A22 प्रोसेसर
  • 8MP ड्युअल रियर + 5MP सेल्फी कॅमेरा
  • 10W 5,000mAh बॅटरी

रेडमी ए1 स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले एचडी+ रिजोल्यूशन, 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि 1600 X 720 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. Redmi A1 अँड्रॉइड 12 आधारित मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी22 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी रेडमी ए1 स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली एक एआय लेन्स पण आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: गुपचूप बाजारात आला Vivo Y56 5G; 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह इतकी आहे किंमत

Redmi A1 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो. या फोनमध्ये 3.5एमएम जॅक सहित ब्लूटूथ 5.0 तथा 2.5 वायफाय सारखे फीचर्स मिळतात. तसेच पावर बॅकअपसाठी नवीन रेडमी मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here