सॅमसंग-रियलमी राहिले मागे! 200MP कॅमेरा आणि सर्वात पावरफुल प्रोसेसरसह येणार Redmi K50S Pro

Redmi च्या के सीरिजचा जबरदस्त स्मार्टफोन Redmi K50i नुकताच भारतात सादर करण्यात आला आहे. या हँडसेटनं AnTuTu बेंचमार्किंग स्कोरमध्ये आयफोन 13 ला देखील मात दिली होती. आता शाओमी या सीरिजमध्ये आणखी शक्तिशाली स्मार्टफोन सादर करण्याची तयारी करत आहे. Redmi K50S Pro स्मार्टफोन 200-मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह सादर केला जाईल. याआधी देखील अशाप्रकारची माहिती आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आगामी रेडमी स्मार्टफोन हाय रिफ्रेश रेट असलेल्या शानदार OLED डिस्प्लेसह बाजारात येईल. तसेच फोनमध्ये 200-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर मिळेल जो जगातील सर्वात मोठा मोबाईल कॅमेरा सेन्सर आहे.

टिपस्टर योगेश बरारनं ट्वीटरवर अपकमिंग Redmi K50S Pro स्मार्टफोनची काही माहिती शेयर केली आहे. चिनी सोशल मीडिया साईट Weibo वर रेडमीचा हा स्मार्टफोन 200-मेगापिक्सल प्रायमरी रियर कॅमेऱ्यासह स्पॉट करण्यात आला आहे. हा फोन चायना 3C डेटाबेसमध्ये मॉडेल नंबर 22081212C सह स्पॉट झाला आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर दिला जाईल. आता योगेश बरारनं पुन्हा एकदा या आगामी स्मार्टफोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची पुष्टी केली आहे.

Redmi K50S Pro चे लीक स्पेसिफिकेशन्स

Redmi K50S Pro स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा OLED डिस्प्ले दिला जाईल, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ ला सपोर्ट करेल. योगेश बरारनुसार, रेडमीचा हा फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह बाजारात येईल, जो क्वॉलकॉमचा शक्तिशाली चिपसेट आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यातील प्रायमरी कॅमेरा 200-मेगापिक्सलचा आहे सोबतीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP ची मॅक्रो कॅमेरा लेन्स देण्यात आली आहे. फोनच्या फ्रंटला 20MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल.

रेडमीचा अपकमिंग फोन 8GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 12GB रॅम + 256GB स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात येईल. हा फोन 5000mAh ची बॅटरी आणि 120W चार्जिंग सपोर्टसह सादर करण्यात येईल. Redmi K50S Pro स्मार्टफोनमध्ये ड्युअल स्पिकर सेटअप देण्यात येईल. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित MIUI 13 वर चालेल. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाईल.

भारतातील Redmi K50i चे स्पेसिफिकेशन्स

Redmi K50i 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा Full-HD+ LCD पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 270Hz आहे. हा फोन Android 12 आधारित MIUI वर चालतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 8100 चिपसेटची प्रोसेसिंग पावर मिळते. सोबतीला 8GB LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. रेडमीच्या या फोनमध्ये सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. यातील 5,080mAh ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here