PUBG मोबाईलच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच लाववतो कि हा जगातील सर्वात जास्त कामे करणारा ऑनलाइन गेम बनला आहे. इतकेच नाही तर पबजी ने घोषणा केली आहे कि मोबाईल वर हा गेम आता पर्यंत 40 कोटी पेक्षा जास्त वेळा डाउनलोड केला गेला आहे.
कमाई
चीनच्या बाहेर या गेमचे डेली 5 कोटी यूजर्स आहेत. कमाई बद्दल बोलायचे तर गेल्या महिन्यात 146 मिलियन डॉलरची कमाई केली आहे जी इतर ऑनलाइन गेम्सच्या कमाई पेक्षा खूप जास्त आहे. पण अनेकदा पबजी बॅनच्या बातम्या पण समोर येत होत्या.
नवीन अपडेट
अलीकडेच पबजी मोबाईल ने आपल्या गेम मध्ये नवीन अपडेट सादर केला आहे. या गेम मध्ये आता नवीन 4×4 बॅटल मोड आला आहे. या अपडेट सह तुम्हाला नवीन न्यू मॅप, कस्टम स्किन आणि जास्त डेडिकेट सेटिंग ऑप्शन पण मिळतो.
पबजी मोबाईल गेमर्सच्या सोयीसाठी आणि नवीन रोमंचासाठी कंपनी वेळोवेळी नव-नवीन अपडेट सादर करत असते. माहिती समोर आली आहे कि पबजी मोबाईल एक आणि स्नो थीम मॅपची तयारी करत आहे. पण याची अधिकृत माहिती बाहेर आलेली नाही.
अशी होते कमाई
विशेष म्हणजे गेमची जास्तीत जास्त कमाई इन-गेम परचेस मधून होते. आपल्या इन-गेम लुक साठी प्लेयर्स स्किन आणि कॉस्ट्यूम्स विकत घेतात. तसेच चीन मध्ये पबजी मोबाईल बॅन झाल्यानंतर लॉन्च केलेल्या गेम फॉर पीस मुळे पण कंपनीला फायदा होत आहे.