ivo T3x 5G चे लाँच ब्रँडने केले कंफर्म, 15 हजारांपेक्षा पण कमी असेल किंमत

विवो T3 सीरिजचा नवीन स्मार्टफोन Vivo T3x 5G लाँचसाठी तयार आहे. ब्रँडने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर नवीन टिझर शेअर करत डिव्हाईस सादर होण्याची माहिती दिली आहे. हे पण सांगण्यात आले आहे की फोन भारतात मात्र 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येईल. हेच नाही तर यात स्नॅपड्रॅगन चिपसेट मिळण्याची गोष्ट पण कंफर्म झाली आहे. चला, पुढे फ्लिपकार्ट लिस्टिंगची माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Vivo T3x 5G फ्लिपकार्ट टिझर

  • तुम्ही खाली दिलेल्या फोटोमध्ये पाहू शकता की Vivo T3x 5G फोन कमिंग सून सह दर्शविले आहे. ज्यामुळे याची लाँच या महिन्यात कंफर्म झाली आहे.
  • फ्लिपकार्टवर समोर आलेल्या टिझरनुसार डिव्हाईसची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असणार आहे. परंतु लाँचच्या वेळी फोनसाठी किती मेमरी व्हेरिएंट येणार आहेत हे अजून कंफर्म झाले नाही, परंतु ही किंमत याच्या बेस मॉडेलची असण्याची शक्यता आहे.
  • डिव्हाईसचा फोटो समोर आला आहे त्यावरून हे पण कंफर्म झाले आहे की यात बॅक पॅनलवर मोठा सर्कुलर कॅमेरा माड्यूल असणार आहे. ज्यात ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश दिला जाईल.
  • ब्रँडने शेअर केले आहे की Vivo T3x 5G मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असणार आहे. तसेच, अजून चिपसेटच्या नावाचा खुलासा झाला नाही, परंतु हे पण सांगण्यात आले आहे की याचा अंतूतू स्कोर 560k आहे.
  • टिझरमध्ये ब्रँडने चिपसेटच्या नावाचा खुलासा करण्यासाठी 12 एप्रिलची तारिख दिली आहे, ज्यानंतर 15 एप्रिलला बॅटरी आणि इतर माहिती समोर येईल.

Vivo T3x 5G चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • सांगण्यात आले आहे की Vivo T3x 5G मोबाईल खूप पातळ ठेवला जाऊ शकतो. यात युजर्सना अ‍ॅमोलेड डिस्प्ले सादर केला जाऊ शकतो.
  • रिपोर्टनुसार, Vivo T3x 5G क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेटसह भारतीय बाजारात एंट्री घेईल.
  • बॅटरी अनुभवसाठी ब्रँड Vivo T3x 5G मध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी देऊ शकतो. तसेच दावा करण्यात आला आहे की हा एकदा चार्ज केल्यावर दोन दिवसांपर्यंत चालेल.
  • रिपोर्टमध्ये हे पण समोर आले आहे की फोनमध्ये ऑडियो बूस्टरला सपोर्टसह ड्युअल स्टीरियो स्पिकर मिळू शकतात, ज्यामध्ये वॉल्यूम 300 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची सुविधा दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here