थिएटरमध्ये धुमाकूळ घालणारा Thor: Love And Thunder चित्रपट येतोय OTT वर, जाणून रिलीज डेट

Marvel movies संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहेत. Captain America, Iron Man, Hulk, Thor आणि Spider man अशा अनेक सुपर हीरोजच्या Avengers टीमचे कोट्यवधी चाहते जगभर पसरले आहेत. अलीकडेच Doctor Strange in the Multiverse of Madness या मार्वल मुव्हीनं नवीन रेकॉर्ड बनवले आहेत आणि आता Thor: Love and Thunder नं देखील बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु केली आहे. नवीन थोर मुव्ही भारतात 7 जुलैला रिलीज करण्यात आली आहे. रिलीज होऊन एक दिवस देखील झाला नाही परंतु दर्शकांना या चित्रपटाच्या OTT premiere चे वेध लागले आहेत.

Thor: Love and Thunder भारतात 7 जुलैला रिलीज झाला आहे, देशातील शेकडो स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ही फिल्म बघण्यासाठी लोक थिएटर्समध्ये गर्दी करत आहेत आणि लवकरच थोर: लव अँड थंडर 100 कोटी क्लबमध्ये समाविष्ट होईल, अशी अपेक्षा आहे. अनेक भारतीयांना चित्रपट थिएटरच्या ऐवजी घरी बसून OTT Platform वर बघायला आवडतात. एका मल्टिप्लेक्सच्या तिकिटामध्ये दर्शकांना हजारो मुव्हीज स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर बघायला मिळतात. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मला वेळेचं बंधन नसतं त्यामुळे कधीही आणि कुठेही आवडीचा चित्रपट पाहता येतो. अशा चित्रपटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आली आहे, ही मार्वल मुव्ही कधी ओटीटीवर येईल तसेच कोणत्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ही बघू शकाल याची माहिती लीक झाली आहे. हे देखील वाचा: कधी येणार Jio 5G, किती असेल रिचार्ज प्लॅनची Price आणि नवीन SIM घ्यावं लागेल का? जाणून घ्या

Thor: Love and Thunder on OTT

मिळालेल्या माहितीनुसार, ही नवीन मार्वल मुव्ही Disney+ Hotstar वर रिलीज केली जाईल. ज्या लोकांकडे डिज्नी+ हॉटस्टारचा अ‍ॅक्सेस आहे, ते लोक ही फिल्म आपल्या घरी स्मार्टफोन आणि स्मार्टटीव्हीमध्ये बघू शकतील. महत्वाची बाब म्हणजे Thor: Love and Thunder जर ओटीटीवर बघायचा असेल तर Disney+ Hotstar Premium subscription असणं आवश्यक आहे. विशेष म्हणजे डिज्नी हॉटस्टारवर या हॉलीवुड मुव्हीचे भारतीय भाषांमधील डब व्हर्जन्स देखील उपलब्ध होतील. हे देखील वाचा: फक्त 451 रुपयांमध्ये तुमचा होईल Motorola चा जबरदस्त 5G स्मार्टफोन; बजेटमध्ये 50MP कॅमेरा

Thor: Love and Thunder ओटीटीवर कधी होणार रिलीज?

MCU म्हणजे मार्वल सिनेमॅटिक यूनिवर्स किंवा Disney+ Hotstar कडून अजूनतरी Thor: Love and Thunder OTT Release Date सांगण्यात आली नाही. परंतु मीडिया रिपोर्टनुसार, या फिल्मचा OTT premiere ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होईल. या चित्रपटात Thor ची भूमिका ऑस्ट्रेलियन अभिनेता Chris Hemsworth नं निभावली आहे. तर बॅटमॅन म्हणून लोकप्रिय झालेला Christian Bale चित्रपटात सुपरव्हिलन Gorr The God Butcher च्या भूमिकेत दिसला आहे. विशेष म्हणजे थॉरची पुर्वाश्रमीची गर्लफ्रेंड Jane Foster या चित्रपटात अनेक वर्षानंतर दिसली आहे. Natalie Portman नं जेनची भूमिका साकारली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here