
Vivo नं भारतात आपला लेटेस्ट मिड रेंज स्मार्टफोन Y100A लाँच केला आहे. हा फोन शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह येतो. या फोनची स्लीक डिजाइन लक्ष वेधून घेते. हा फोन ग्लास बॅकसह येतो ज्यामुळे प्रीमियम लुक आणि फील मिळतो. फोन तीन कलर – मेटल ब्लॅक, ट्वायलाइट गोल्ड आणि पॅसिफिक ब्लू मध्ये कलरमध्ये विकत घेता येईल. चला जाणून घेऊया Snapdragon 695 प्रोसेसर आणि 5जी सपोर्ट असलेल्या या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.
विवो वाय100ए 5जी स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
- 6.38 इंच AMOLED डिस्प्ले
- Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर
- 64MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप
- 4500mAh बॅटरी (44W फास्ट चार्जिंग)
Vivo Y100A स्मार्टफोनमध्ये 6.38-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2400 × 1080 (FHD+) आहे. या डिस्प्लेची ब्राइटनेस जोरदार आहे, जी भर उन्हात देखील स्क्रीन पाहू देते. मल्टी टच स्क्रीन युजर्सना स्मूद आणि रिस्पॉन्सिव एक्सपीरियंस ऑफर करतो. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
Vivo Y100A स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर मिळतो. या फोनमध्ये 8GB रॅमचा सपोर्ट देण्यात आला आहे. फोन 128GB आणि 256GB अशा दोन स्टोरेज ऑप्शनसह मार्केटमध्ये आला आहे. यात 4500 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Vivo Y100A स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 64MP OIS प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, जोडीला 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ कॅमेरा आहे. 16MP फ्रंट फेसिंग कॅमेरा देखील मिळतो.
विवोच्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, ब्लूटूथ 5.1, USB Type-C, आणि GPS असे ऑप्शन मिळतात. या फोनमध्ये ड्युअल सिम स्टॅन्ड बाय (DSDS) मोड मिळतो, ज्यात फोन दोन सिम एकत्र वापरता येतात. यात 2G, 3G, 4G FDD-LTE, 4G TDD-LTE, 5G NSA, आणि 5G SA नेटवर्कचा सपोर्ट मिळतो.
विवो वाय100ए 5जीची किंमत आणि सेल डेट
Vivo Y100a स्मार्टफोन मिड रेंजमध्ये शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह येतो. कंपनीनुसार हा फोन किफायतशीर किंमतीत दर्जेदार परफॉर्मन्स देतो. परंतु विवोनं अजूनतरी वाय100A स्मार्टफोनच्या किंमत, ऑफर आणि सेल डेटबद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. लीक रिपोर्ट्सनुसार विवोचा हा फोन 26,999 रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतो.
















