रियलमी 12 सीरीजचे 5 मोबाईल फोन भारतात उपलब्ध आहेत ज्यांचे नाव Realme 12 5G, 12x 5G, 12+ 5G, 12 Pro 5G आणि 12 Pro+ 5G आहे. हे सर्व स्मार्टफोन 5 जीला सपोर्ट करतात. तसेच शेजारी देश पाकिस्तानमध्ये कंपनीने या सीरीजला सादर करत एक नवीन Realme 12 4G फोन लाँच केला आहे. हा लो बजेट स्मार्टफोन आहे जो सर्वप्रथम Pakistan मध्ये विकला तसेच येत्या दिवसांमध्ये भारतीय बाजारात पण एंट्री घेईल. रियलमी 12 4 जी ची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.
Realme 12 4G ची किंमत
रियलमी 12 4 जी फोन पाकिस्तानमध्ये 8GB RAM वर लाँच झाला आहे जो 128GB आणि 256GB स्टोरेजवर सेलसाठी उपलब्ध होईल. मोबाईलची किंमत PKR 59,000 ने सुरु होत आहे जी भारतीय चलनानुसार 17,900 रुपयांच्या आसपास आहे. पाकिस्तानमध्ये नवीन रियलमी मोबाईल Skyline Silver आणि Pioneer Green कलरमध्ये विकला जाईल.
Realme 12 4G चे स्पेसिफिकेशन
- 6.67″ ओएलईडी 120 हर्ट्झ स्क्रीन
- क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट
- 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज
- 8 जीबी डायनॉमिक रॅम टेक्नॉलॉजी
- 50 मेगापिक्सल बॅक कॅमेरा
- 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- 67 वॉट फास्ट चार्जिंग
- 5,000 एमएएच बॅटरी
स्क्रीन: Realme 12 4G फोन 2400 × 1080 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.67-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. ही AMOLED स्क्रीन आहे जी 120Hz रिफ्रेश रेटवर चालते तसेच 2000nits ब्राईटनेसला सपोर्ट करते. या मोबाईलमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळेल.
परफॉर्मन्स: रियलमी 12 4 जी फोन अँड्रॉईड 14 वर सादर केला जाईल जो realme UI 5.0 सह मिळून चालतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाईलमध्ये 2.2GHz क्लॉक स्पीडवर रन करणारा Qualcomm Snapdragon 695 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
मेमरी: पाकिस्तानमध्ये Realme 12 4G स्मार्टफोनला 8 जीबी रॅमवर लाँच करण्यात आले आहे. हा मोबाईल 8GB Dynamic RAM टेक्नॉलॉजीसह आहे जो फिजिकल रॅमसह मिळून याला 16GB RAM ची ताकद प्रदान करतो. तसेच फोनमध्ये 256 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेज मिळते.
कॅमेरा: फोटोग्राफीसाठी हा मोबाईल ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करता. फोनच्या बॅक पॅनलवर 50MP LYT-600 OIS मेन सेन्सर देण्यात आला आहे जो 2MP macro सेन्सरसह मिळून चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग करण्यासाठी यात 16MP Front कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी: पावर बॅकअपसाठी Realme 12 4G फोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळेल. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी हा स्मार्टफोन 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह करण्यात आला आहे.
इतर फिचर्स: हा मोबाईल IP54 रेटिंग सोबतच Rainwater Smart touch ला पण सपोर्ट करतो. तसेच बेसिक कनेक्टिव्हिटी फिचर्ससह NFC ला सपोर्ट पण देण्यात आला आहे तसेच यात 3.5mm हेडफोन जॅक पण मिळतो.