Lava Blaze Curve 5G फोनच्या लाँचची तारीख घोषित, किलर लुकसोबत येईल हा स्टायलिश स्मार्टफोन

लावाने अधिकृतपणे घोषणा केली आहे की येत्या 5 मार्चला आपला नवीन मोबाईल Lava Blaze Curve 5G फोन भारतात लाँच करणार आहे. जसे की फोनच्या नावावरून असे समजत आहे की हा स्मार्टफोन ‘कर्व्ड डिस्प्ले’ सह मार्केटमध्ये एंट्री घेईल. फोनच्या लाँचची माहिती सोबतच लावा ब्लेज कर्व 5 जी किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची लीकची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Lava Blaze Curve 5G भारतातील लाँचची माहिती

लावा ब्लेज कर्व 5जी फोन 5 मार्चला भारतात लाँच होईल. या तारखेला कंपनी दुपारी 12 वाजता ऑनलाईन इव्हेंटचे आयोजन करणार आहे ज्यामध्ये फोनची किंमत व सेलची सर्व माहिती दिली जाईल. लावा भारतातील सोशल मीडिया हँडल तसेच युट्युब चॅनेलवर या लाँचच्या इव्हेंटल लाईव्ह दाखविणार आहे. तसेच शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर पण Lava Blaze Curve 5G चे लाँच पाहायला मिळू शकते.

Lava Blaze Curve 5G किंमत (लीक)

लावा ब्लेज कर्व 5जी फोनबाबत एक लीक अलीकडेच समोर आली होती ज्यानुसार हा मोबाईल भारतीय बाजारात दोन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 128GB Storage दिली जाऊ शकते ज्याची किंमत 15,999 रुपये सांगण्यात आली आहे. तसेच मोठा मॉडेल 256GB Storage वर लाँच होऊ शकतो ज्याची किंमत 18,999 रुपये पाहायला मिळू शकते. हा स्मार्टफोन 8GB RAM सोबत मार्केटमध्ये एंट्री घेऊ शकतो.

Lava Blaze Curve 5G स्पेसिफिकेशन्स

  • 64MP Rear Camera
  • 120Hz AMOLED Screen
  • MediaTek Dimensity 7050
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 18W 5,000mAh Battery
  • स्क्रीन: लीकनुसार लावा ब्लेज कर्व 5 जी फोनमध्ये अ‍ॅमोलेड पॅनल वाली स्क्रीन पाहायला मिळू शकतो. या डिस्प्लेवर 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर: Lava Blaze Curve 5G फोनला मीडियाटेक डाइमेंसिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केले जाऊ शकते. टीज केले जात आहे की हा चिपसेट 5,50,000 AnTuTu स्कोर प्राप्त करू शकतो.
  • कॅमेरा: फोटोग्राफीसाठी या लावा मोबाईलला ट्रिपल रिअर कॅमेरावर लाँच केले जाऊ शकते. लीकनुसार हा स्मार्टफोन 64 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरला सपोर्ट करेल.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी लावा ब्लेज कर्व 5जी फोन को 5,000एमएएच बॅटरीसह मार्केटमध्ये येऊ शकतो. तसेच या बॅटरीला फास्ट चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here