50 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह रियलमी सी33 2023 लाँच; जाणून घ्या किंमत

Highlights

  • रियलमी सी33 2023 ची विक्री कंपनीच्या साइटवर सुरु.
  • रियलमी सी33 2023 मध्ये यूनिसॉक टी612 प्रोसेसर आहे.
  • फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते.

Realme नं भारतीय बाजारात सी-सीरीजमध्ये आपला नवीन मोबाइल फोन रियलमी सी33 2023 सादर केला आहे. हा फोन गेल्यावर्षी टेक मार्केटमध्ये आलेल्या सी33 चा नवीन व्हर्जन आहे. दोन्ही मॉडेल्स दरम्यन रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनचा फरक आहे उर्वरित स्पेसिफिकेशन सारखेच आहेत. लाँच करण्यात आलेल्या नवीन स्मार्टफोन बद्दल बोलायचं झालं तर यात ऑक्टा-कोर यूनिसॉक टी612 प्रोसेसर आणि 5,000एमएएचची बॅटरी मिळते.

रियलमी सी33 2023 ची भारतीय किंमत

भारतात रियलमी सी33 2023 दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या 4GB + 64GB कॉन्फिगरेशन ऑप्शनची किंमत 9,999 रुपये आहे. हँडसेटच्या 4GB + 128GB व्हर्जनची किंमत 10,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच रियलमी सी33 2023 रियलमी ऑनलाइन स्टोरवरून विकत घेता येईल, जिथे हा सेलसाठी उपलब्ध आहे. हे देखील वाचा: OPPO Find N2 Flip च्या भारतीय किंमतीची घोषणा; वेबसाइटसह फ्लिपकार्टवरून होईल विक्री

रियलमी सी33 2023 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ HD+ LCD Display
  • UNISOC T612 SOC
  • 4GB RAM, 128GB storage
  • 50MP dual camera
  • 5000mAh Battery

रियलमी सी33 2023 मध्ये 6.5-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन 60Hz रिफ्रेश रेट आणि 120Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. तसेच फोनमध्ये ऑक्टा-कोर यूनीएसओसी टी612 प्रोसेसर आणि माली जी57 जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन 4GB LPDDR4X रॅम आणि 128GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेजसह येतो.

फोटोग्राफीसाठी हँडसेटमध्ये मागे एक ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 50MP चा प्रायमरी शूटर आणि 2MP ची मॅक्रो लेन्स आहे. हँडसेटमध्ये व्हिडीओ कॉल आणि सेल्फीसाठी 5MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच हा सी-सीरीजचा नवीन स्मार्टफोन 5000 एमएएच बॅटरी आणि 10W चार्जिंगला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: iQOO Z7i झाला चीनमध्ये लाँच; Dimensity 6020 प्रोसेसर असलेला पहिला फोन

स्मार्टफोनमध्ये एक मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आहे आणि यात 3.5 मिमी ऑडियो जॅक देखील आहे. सुरक्षेसाठी डिवाइसमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. हँडसेट रियलमी युआय एस एडिशनसह अँड्रॉइड 12 वर चालतो. फोन अ‍ॅक्वा ब्लू, सॅंडी गोल्ड आणि नाइट सी कलर ऑप्शनमध्ये येतो. याचे डायमेंशन 164.2×75.7×8.4mm आणि वजन 187 ग्राम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल-सिम, 4G, 2.4GHz WiFi, ब्लूटूथ 5.0, GPS, Glonass आणि Galileo असे ऑप्शन मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here