50 इंच स्मार्ट टीव्ही फक्त 24,999 रुपयांमध्ये, 40 वॉट स्पीकर, क्वाड-कोर प्रोसेसर आणि गुगल ॲप्सने आहे सुसज्ज

जर तुम्ही सणासुदीच्या काळात तुमच्या घरासाठी नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. खरं तर KODAK च्या 50 इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर प्रचंड सूट मिळत आहे. 41 हजारांपेक्षा जास्त किंमत असलेला KODAK CA PRO स्मार्ट टीव्हीला तुम्ही फक्त 24,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. विशेष बाब म्हणजे त्यावर बँक ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय असे पर्याय देखील आहेत. त्यानंतर किंमत आणखी कमी होते. तर चला मग पुढे लगेच टीव्हीवर मिळणाऱ्या ऑफर्स आणि फिचर्स बद्दल जाणून घेऊया.

KODAK चा 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही (KODAK CA PRO स्मार्ट टीव्ही) किंमत आणि ऑफर

  • सध्या Kodak च्या 50 इंचाच्या स्मार्ट टीव्हीला 40 टक्के डिस्काऊंटसह फक्त 24,999 रुपयांना विकले जात आहे. तर फ्लिपकार्ट वेबसाईटवर या टीव्हीची चिन्हांकित किंमत 41,999 रुपये आहे.
  • या सवलती व्यतिरिक्त बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत. जिथे ॲक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, आरबीएल आणि येस बँकेच्या कार्डवर 10 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सूट दिली जात आहे.
  • बँक ऑफरसह या 50 इंचाच्या स्मार्ट टीव्हीला 1,750 रुपयांपर्यंत स्वस्त खरेदी केला जाऊ शकतो ज्यामुळे त्याची किंमत 23,249 रुपये होईल.
  • जर तुम्हाला टीव्ही खरेदी करण्यासाठी पूर्ण पेमेंट एकाच वेळी करायचे नसेल तर नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही उपलब्ध आहे. ज्याच्या मदतीने 3 ते 9 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांवर हा डिव्हाईस खरेदी करता येईल.
  • तुम्हाला 3 महिन्यांच्या ईएमआय वर 8,333 रुपये, 6 महिन्यांच्या ईएमआयवर 4,167 रुपये आणि 9 महिन्यांच्या ईएमआयवर 2,778 रुपये द्यावे लागतील.

कुठे खरेदी कराल

वर नमूद केलेल्या सर्व ऑफर्स सह तुम्ही हा कोडॅक 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. ज्याची लिंक आम्ही खाली हायलाईट केली आहे. याला भेट देऊन तुम्ही सर्व तपशील तपासू शकता.
फ्लिपकार्ट लिंक

कोडॅक 50 इंचाच्या स्मार्ट टीव्हीचे स्पेसिफिकेशन

  • कोडॅक 50 इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये सिनेमापासून प्रेरित तंत्रज्ञान असलेले फोटो इमर्सिव्ह घरगुती मनोरंजन मिळते.
  • यावर तुम्हाला अल्ट्रा एचडी (4K), 3840 x 2160 पिक्सेल रिझोल्यूशन, 500 निट्स ब्राईटनेस आणि 60 हर्ट्स रिफ्रेश रेट मिळते. हा पॅनल डीएलईडी तंत्रज्ञानावर आधारित आहे.
  • उत्कृष्ट ऑडिओसाठी 40 वॉट स्पीकर्स मिळत आहेत. कोडॅक गुगल टिव्ही मध्ये नवीनतम डॉल्बी डिजिटल प्लस फिचर आहे, जे चित्रपट आणि शोपासून संगीत आणि गेमपर्यंत सर्व काही पुढील स्तरावर घेऊन जाते.
  • क्वाड-कोर सीपीयू, माली क्वाड-कोर जीपीयू आणि 1.5 गिगाहर्ट्झ पर्यंतच्या उच्च क्लॉक स्पीडच्या सुविधेसह हा कोडॅक टीव्ही स्मुथ अनुभव देतो.
  • कोडॅक गुगल टिव्ही सह तुम्ही संपूर्ण गुगल इकोसिस्टम जसे की प्ले स्टोअर, गुगल मूव्ही आणि टिव्ही, गुगल म्युझिक, गुगल गेम्स आणि बरेच काही ॲक्सेस करू शकता. यासोबतच गुगल ओएस सह तुम्ही तुमच्या मोबाईलवरून टीव्हीवर कंन्टेट शेअर करू शकता.
  • युएसबी 2.0 आणि एचडीएमआय एआरसी/सीईसी सारख्या पोर्टसह एकत्रित असलेला हा टीव्ही तुम्हाला विविध डिव्हाईस आणि उपकरणांना कनेक्ट करण्याची संधी देतो. यात ब्लूटूथ 5.0 आहे, वायफाय, कंन्टेट मिरर करण्यासाठी क्रोमकास्ट किंवा आयओएस एअरप्ले ॲपचा वापर केला जाऊ शकतो.
  • तुम्ही गुगल असिस्टंट सोबत कोडॅक गुगल टिव्हीवर प्रश्न विचारू शकता. हॉटकीज द्वारे तुमच्या आवडत्या शो ला पटकन शोधू शकता आणि तुमच्या स्मार्टफोनला टीव्ही रिमोट म्हणून देखील वापरू शकता.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here