OTT दर्शकांसाठी नेहमीप्रमाणे हा विकेंड खास असणार आहे, कारण डिजिटल प्लॅटफॉर्मवर यावेळी वेब सीरीज सोबतच थेट चित्रपट रिलीज करण्यात आले आहेत. यावेळी शुक्रवारी गोविंदा नाम मेरा, हाफ पँट्स फुल पँट्स शो आणि बिजनेसबाजी शो रिलीज करण्यात आला आहे. जर तुम्ही देखील तुमच्या करमणुकीची सोय करू इच्छित असाल तर आम्ही तुमच्यासाठी या आर्टिकलमध्ये या आठवड्यात रिलीज झालेल्या ओटीटी चित्रपट आणि सीरीजची माहिती देणार आहोत. पाहा यादी.
New OTT Release
- गोविंदा नाम मेरा
- बीस्ट ऑफ बँगलोर
- डॉक्टर जी
- हाफ पँट्स फुल पॅंट्स
- बिजनेस बाजी
- कोड नेम तिरंगा
Govinda Naam Mera
आज म्हणजे शुक्रवार 16 डिसेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टारवर गोविंदा नाम मेरा चित्रपट रिलीज झाला आहे. हा विक्की कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणीचा एक कॉमेडी थ्रिलर चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन शशांक खेताननं केलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनुसार ‘गोविंदा नाम मेरा’ मध्ये आपल्या अभिनयासाठी ओळखले जाणारे मराठी मराठी कलाकार दिसत आहेत. या मराठी कलाकारांच्या यादीत रेणुका शहाणे, अमेय वाघ, सयाजी शिंदे, तृप्ती खामकर यांचा समावेश आहे.
Beast Of Bangalore
क्राइम डॉक्यूमेंट्री सीरीज इंडियन प्रिडेटरमध्ये एक शो येत आहे. या शोचे नाव Beast Of Banglore ठेवण्यात आलं आहे. यावेळी या शोमध्ये बँगलोरमधील एका गुन्ह्याची घटना दाखवण्यात आली आहे. तुम्हाला आठवत असेल की याआधी नागपुरमधील घटना या डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवण्यात आली होती, ज्यात भर न्यायालयात जवळपास 200 महिलांनी एका अपराध्याची हत्या केली होती.
Doctor G
आयुष्मान खुरानाचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 11 डिसेंबरपासून स्ट्रीम करता येईल. या चित्रपटात Ayushmann Khurrana डॉ. उदय गुप्ता नावाच्या एका मेडिकल स्टूडेंटच्या भूमिकेत आहे ज्याला ऑर्थोपेडिक सर्जन बनायचं आहे. परंतु परिस्थितीमुळे त्याला मनाविरुद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ विभागात प्रवेश घ्यावा लागतो. महिला एका पुरुष गायनोकॉलजिस्टचा सहज स्वीकार करत नाहीत, म्हणजे त्यांना उदय गुप्ता कडून उपचार करवून घ्यायचे नसतात. तसेच उदय गुप्ताला देखील या क्षेत्रात रस नसल्यामुळे गोंधळ आणखी वाढतो. याबाबतीत महिला डॉक्टर्स आणि स्टाफ कशाप्रकारे त्याला मदत करतात याची ही गोष्ट आहे.
Half Pants Full Pants
ही वेब सीरीज 16 डिसेंबरला प्राइम व्हिडीओवर रिलीज केली जाईल. हाफ पँट्स फुल पँट्स शो मध्ये एकूण आठ एपिसोड्स आहेत. तसेच ही सीरीज आनंद सुस्पी यांच्या कादंबरीवर आधारीत आहे. जेव्हा मोबाइल आणि इंटरनेट नव्हतं त्या काळातील एक गोष्ट या वेब सीरिजमधून दाखवण्यात आली आहे.
Business Baazi
Shark Tank India प्रमाणेच बिजनेस संबंधित आणखी एक शो येणार आहे. हा शो ओटीटी प्लॅटफॉर्म MX Player वर 16 डिसेंबरला येईल. परंतु या शोची थीम शार्क टँक इंडियापेक्षा वेगळी असेल. बिजनेस बाजी शो मध्ये शाळेतील मुलांच्या संघाना बिजनेस संबंधित प्रश्न विचारले जातील. या शोचं सूत्रसंचालन अपारशक्ती खुराना करताना दिसेल. तसेच कॉमेडियन संकेत भोसले देखील या शोमध्ये आहे आणि Dr. Vivek Bindra यांचा समावेश देखील करण्यात आला आहे.
Code Name Tiranga
काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहांमध्ये आलेला Code Name Tiranga चित्रपट आता ओटीटीवर रिलीज केला जाणार आहे. हा चित्रपट 16 डिसेंबरला Netflix वर रिलीज केला जाईल. चित्रपटात Parineeti Chopra आणि Hardy Sandhu लीड रोल मध्ये आहेत. Uunchai नंतर हा परिणीती चोप्राचा हा यावर्षीचा दुसरा चित्रपट आहे.