iQOO 9 Pro च्या एमआरपीवर 17 हजारांची सूट

कालच iQOO नं आपली नवीन फ्लॅगशिप सीरिज iQOO 11 आपल्या होम मार्केट चीनमध्ये लाँच केली आहे. या सीरिजमध्ये iQOO 11 आणि iQOO 11 Pro असे स्मार्टफोन जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह सादर करण्यात आले आहेत. हे फोन भारतीय बाजारात येण्यासाठी ग्राहकांना जानेवारी 2023 पर्यंत वाट पाहावी लागेल. परंतु तुम्हाला आताच दमदार स्मार्टफोन हवा असेल तर तुम्ही iQOO 9 Pro 5G चा विचार करू शकता. जो ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन इंडियावर 25000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकला जात आहे.

iQOO 9 Pro 5G वर मोठा डिस्काउंट

iQOO 9 Pro 5G स्मार्टफोनचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर 74,990 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. या फोनवर 23 टक्के डिस्काउंट म्हणजे 17,000 रुपयांची सूट मिळत आहे. त्याचबरोबर HDFC बँकेच्या युजर्सना फोनवर 8000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे. म्हणजे हा फोन एकूण 25,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. डिस्काउंट आणि बँक ऑफरसह आयकूचा हा फोन 49,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर एक्सचेंज डिस्काउंटसह देखील विकत घेता येईल. म्हणजे जुना फोन एक्सचेंज करून हा फोन आणखी कमी किंमतीत विकत घेता येईल. हे देखील वाचा: 16GB रॅमसह आला दणकट स्मार्टफोन; 120W फास्ट चार्जिंगसाठी वनप्लसपेक्षा स्वस्त iQOO Neo 7 SE लाँच

iQOO 9 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

iQOO 9 Pro 5G फोन Android 12 OS आधारित Funtouch OS 12 कस्टम स्किनवर चालतो. या फोनमध्ये कूलिंगसाठी VC थ्री-डिमेन्शनल हीट डिसपेशन सिस्टम, 3-डी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि स्टीरियो स्पिकर आहेत. या फोनमध्ये 6.78-इंचाचा 2K E5 AMOLED LTPO 2.0 डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz, अ‍ॅस्पेक्ट रेश्यो 20:9, टच सॅम्पलिंग रेट 360Hz, रिजोल्यूशन 3200 x 1400 पिक्सल आहे.

iQOO 9 Pro स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen1 प्रोसेसर आणि Adreno GPU मिळतो. या फोनमध्ये 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 512GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. तर पावर बॅकअपसाठी यात 4,700mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि 10W रिवर्स चार्जिंग सपोर्टसह मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Wi-Fi 6E, Bluetooth 5.2, GPS, NFC, आणि USB Type-C पोर्टचे ऑप्शन आहेत. हे देखील वाचा: जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह iQOO 11 आणि iQOO 11 Pro लाँच; वनप्लसला मिळणार खरी टक्कर

फोटोग्राफीसाठी iQOO 9 Pro मध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनचा रियर कॅमेरा सेटअप पाहता यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे जो Samsung GN5 सेन्सर आहे आणि हा गिम्बल स्टॅबिलायजेशन आणि LED फ्लॅशसह येतो. प्रायमरी कॅमेऱ्यासह 50MP ची अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि 16MP ची पोर्टेट लेन्स देण्यात आली आहे, जी 2.5x ऑप्टिकल झूम आणि 30x डिजिटल झूमला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here