50MP कॅमेऱ्यासह Nokia G11 Plus आला भारतात

50 megapixel camera phone Nokia G11 Plus launched in india know price specifications details

Nokia G11 Plus: नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबलनं आज भारतीय बाजारात आपला स्वस्त स्मार्टफोन (Cheap Mobile Phone) नोकिया जी11 प्लस लाँच केला आहे. Nokia G11 Plus Price 12,499 रुपये आहे जो 50MP Camera, 90Hz Display, 4GB RAM चिपसेट आणि बॅटरी सारख्या स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो. पुढे नोकिया जी11 प्लस मोबाइल फोनच्या प्राइस, सेल, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

Nokia G11 Plus Specifications

नोकिया जी11 प्लस स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.517 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. हा मोबाइल फोन पॉलीकॉर्बोनट बॉडीवर बनला आहे ज्याचे डायमेंशन 8.55×164.8×75.9 एमएम आणि वजन 192 ग्राम आहे. हे देखील वाचा: Jio 5G launched: वेगवान 5G सर्व्हिससाठी मोबाइलमध्ये ऑन करा ही सेटिंग

50 megapixel camera phone Nokia G11 Plus launched in india know price specifications details

Nokia G11 Plus अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे, ज्याला 2 वर्षांपर्यंत ओएस अपडेट मिळतील. म्हणजे लवकरच हा नोकिया मोबाइल अँड्रॉइड 13 वरही अपडेट होईल. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये Unisoc T606 चिपसेट आहे. नोकिया जी11 प्लस स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनमध्ये 512जीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड वापरता येईल.

फोटोग्राफीसाठी नोकिया जी11 प्लस स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या नोकिया मोबाइल फोनमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

50 megapixel camera phone Nokia G11 Plus launched in india know price specifications details

Nokia G11 Plus ड्युअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई वर चालतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोनमध्ये अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. हा फोन आयपी52 रेटिंगसह बाजारात आला त्येमुळं हा वॉटरप्रूफ बनतो. पावर बॅकअपसाठी नोकिया जी11 प्लस मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह काम करते. हे देखील वाचा: 50MP Camera असलेला OPPO A77s लाँच; 17 हजारांच्या बजेटमध्ये 13GB RAM ची पावर

Nokia G11 Plus Price

नोकिया जी11 प्लस स्मार्टफोन भारतीय बाजारात सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. हा मोबाइल फोन 4 जीबी रॅमला सपोर्ट करतो जोडीला 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Nokia G11 Plus ची Price 12,499 रुपये आहे तसेच हा नोकिया स्मार्टफोन Lake Blue आणि Charcoal Grey कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here