50MP Camera असलेला OPPO A77s लाँच; 17 हजारांच्या बजेटमध्ये 13GB RAM ची पावर

50 MP Camera Phone Oppo A77s Launched Check Price Sale Features Specifications Details

OPPO A77s Launch: ओप्पोनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन OPPO A77s लाँच केला आहे. ए सीरीजमध्ये जोडण्यात आलेला जा ओप्पो मोबाइल 50MP Camera, 8GB RAM, Qualcomm Snapdragon 680 चिपसेट आणि 33W 5000mAh battery ला सपोर्ट करतो ज्याची किंमत 17,999 रुपये आहे. पुढे ओप्पो ए77एस स्मार्टफोनच्या प्राइस व सेल सोबतच फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.

OPPO A77s Price

ओप्पो ए77एस स्मार्टफोन भारतात सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. हा ओप्पो मोबाइल 8 जीबी रॅमला सपोर्ट करतो, जोडीला 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. OPPO A77s स्मार्टफोनची प्राइस 17,999 आहे जो Sunset Orange आणि Starry Black कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. ओप्पो ए77एसवर बँक ऑफर अंतगर्त 10 टक्के कॅशबॅक मिळत आहे तसेच हा 6 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयवर देखील विकत घेता येईल. हे देखील वाचा: शाओमीचा बाहुबली फोन! 200MP Camera आणि 120W फास्ट चार्जिंगसह Xiaomi 12T Pro ची दणक्यात एंट्री

50 MP Camera Phone Oppo A77s Launched Check Price Sale Features Specifications Details

OPPO A77s Specifications

ओप्पो ए77एस स्मार्टफोन 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. तसेच ओप्पो या मोबाइल डिस्प्लेमध्ये 600निट्स ब्राइटनेसचा सपोर्ट देखील मिळतो. OPPO A77s मध्ये स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असलेली आहे जिच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे.

50 MP Camera Phone Oppo A77s Launched Check Price Sale Features Specifications Details

OPPO A77s अँड्रॉइड आधारित कलर ओएस 12.1 वर लाँच झाला आहे जो 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटवर चालतो. या फोनमध्ये 8 जीबी रॅम आहे जो 5जीबी वचुर्अल रॅमला देखील सपोर्ट करतो. म्हणजे गरज पडल्यास ओप्पो ए77एस 13जीबी रॅमवर परफॉर्म करू शकतो. तसेच फोन स्टोरेज मेमरी कार्डनं 1टीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी ओप्पो ए77एस स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सल मोनो लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: चार्जिंगविना 100KM धावेल ही स्वस्त Electric Scooter; आग लागण्याची देखील भीती नाही

OPPO A77s ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी ओप्पो मोबाइलच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी ओप्पो ए77एस मध्ये 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here