50MP Camera आणि 5,000mAh Battery असलेला नवीन मोबाइल तयार करत आहे Realme, स्पेसिफिकेशन्स झाले लीक

रियलमीने आज सांगितले आहे की ते realme 12+ 5G भारतात लाँच करणार आहे. सध्या लाँचची तारीख ऑफिशियलपणे सांगण्यात आलेली नाही, परतुं रियलमी 12+ 5 जी फोन 6 मार्चला भारतात सादर होऊ शकतो. या मोबाइलला मार्केटमध्ये येण्याच्या अगोदर एक अन्य रियलमी स्मार्टफोनचे डिटेल्स आता इंटरनेटवर लीक झाले आहेत जो Realme Narzo सीरीज अंतर्गत भारतात आणला जाऊ शकतो.

सर्टिफाइड झाला अगामी रियलमी मोबाइल

हा अगामी रियलमी मोबाइल Realme RMX3999 मॉडेल नंबरसह समोर आला आहे. हा स्मार्टफोन अनेक सर्टिफिकेशन्स साइट्सवर आला आहे, ज्यामध्ये IMEI database तसेच EEC, TKDN, SDPPI आणि TUV Rheinland सारख्या नावाचा समावेश आहे. या सर्व फोनला आरएमएक्स3999 मॉडेल सोबत सार्टिफाइड करण्यात आले आहे. तसेच सध्या या फोनचे ‘मार्केटिंग नेम‘ स्पष्ट झालेले नाही, पण अनुमान लावले जात आहे की फोन भारतात ‘रियलमी नारजो‘ बनून येईल.

असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

  • 6.72″ FHD+ 120Hz Display
  • MediaTek Dimensity 6100+
  • Android 14 + realme UI 5
  • 50MP Dual Rear Camera
  • 45W 5,000mAh Battery
  • स्क्रीन: लीकनुसार हा रियलमी स्मार्टफोन 6.72 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेवर लाँच केला जाऊ शकतो. वर स्क्रीनवर 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 180 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट पाहायला मिळू शकते.
  • प्रोसेसर: प्रोसेसिंगसाठी या मोबाइलमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डाइमेंसिटी 6100+ ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाणार असल्याची चर्चा आहे. हा सीपीयू 2.2 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो.
  • ओएस: लीकनुसार हा अपकमिंग रियलमी स्मार्टफोन सर्वात नवीन अँड्रॉइड आपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 14 वर लाँच केला जाईल. तसेच युजर इंटरफेस पाहता या मोबाइलमध्ये रियलमी युआय 5 दिले जाणार असल्याची गोष्ट लीकमध्ये सांगण्यात आली आहे.
  • कॅमेरा: फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा दिला जाईल. लीकनुसार तो याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असेल ज्यासोबत एक अन्य लेन्स पण असेल. सध्या सेल्फी कॅमेराची माहिती समोर आलेली नाही.
  • बॅटरी: बॅटरी सर्टिफिकेशनमध्ये समोर आले आहे की हा रियलमी स्मार्टफोन 5,000 एमएएच बॅटरीसह मार्केटमध्ये एंट्री घेईल. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी मोबाइल फोनमध्ये 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here