एंडरॉयड फोन मधील डिलीट झालेले फोटो आणि वीडियो कसे रिकवर करावेत ते जाणून घ्या

आधी जेव्हा फीचर फोन लोकांकडे होते तेव्हा यूजर्स आपल्या फोन कॉन्टेक्ट बद्दल खूप गंभीर होते. कोणत्याही प्रकारे कॉन्टेक्ट डिलीट होऊ नये. परंतु आता लोकांकडे एंडरॉयड स्मार्टफोन आहे आणि यूजर्स आपल्या फोन मधील संपूर्ण डेटा बद्दल खूप गंभीर झाले आहेत. यात कॉन्टेक्ट, मेसेज आणि व्हाट्सऍप व्यतिरिक्त फोटो आणि वीडियो यांचा पण समावेश आहे. यातील कॉन्टेक्ट आणि व्हाट्सऍप ची जास्त चिंता नसते. कारण यांचा बॅकअप गूगल वर जातो. पण, फोटो आणि वीडियो जर डिलीट झाले तर अडचण होते. एंडरॉयड फोन मध्ये फोटोज आणि वीडियो बॅकअपचा आॅप्शन गूगल फोटो ऍप मध्ये देण्यात आला आहे पण लोक बॅकअप करत नाहीत कारण यात इंटरनेटचा वापर जास्त होतो. त्यामुळे एखादा जरुरी फोटो डिलीट झाल्यास अडचण होऊ शकते.

पण काही ट्रिक्स आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही डिलीटड फोटोज रिकवर करू शकता. खाली आम्ही एंडरॉयड फोन मध्ये डिलीटड फोटो रिकवर कण्याचे उपाय सांगितले आहेत.

उपाय क्र. 1

Image gallery

एंडरॉयड फोन मध्ये तुम्ही गॅलरी किंवा गूगल फोटोज ऍप मध्ये जाऊन फोटोज बघू शकता किंवा डिलीट करू शकता आणि इथून फोटो रिकवर करणे खूप सोप्पे आहे. जर तुम्ही गूगल फोटोज ऍप मधून इमेज डिलीट केली आहे आणि ती रिकवर करायची असल्यास
1. सर्वात आधी गूगल फोटो ऍप उघडा.

Google photo Bin

2. तिथे डावीकडे वरच्या बाजूला मेन्यूचा आॅप्शन मिळेल त्यावर क्लिक करा.
3. तिथे खाली तुम्हाला बीनचा आॅप्शन मिळेल त्यावर क्लिक करा. सर्व डिलीटड फोटो तिथे दिसतील.
4. जे फोटोज रिकवर करायचे आहेत त्यांना सलेक्ट करून रिस्टोर करा. असे करताच फोटो तुमच्या गॅलरी मध्ये येतील.

लक्षात असू द्या इथून डिलीट फोटोज तुम्ही एका महिन्यात रिकवर करू शकता. एका महिन्यानंतर इथून ते डिलीट होतील आणि मग ते मिळवणे मुश्किल आहे. पण अजून एक उपाय आहे ज्याने तुम्ही खूप आधी डिलीट केलेले फोटोज रिकवर करू शकता.

उपाय क्र. 2

Image gallary

इतकेच नव्हे तर जर तुम्ही गूगल फोटोज ऐवजी गॅलरी मधून फोटोज डिलीट केले आहेत आणि खूप वेळ झाला असेल तर त्यासाठी वेगळी पद्धत आहे. तुम्ही थर्ड पाटी ऍप ची मदत घेऊ शकता. डिलीटड फोटो रिकवर करण्यासाठी डिस्कडिगर फोटो रिकवरी DiskDigger photo recovery खूप चांगला ऍप आहे आणि याचा वापर पण खूप सोप्पा आहे. या ऍप च्या माध्यमातून फोटो रिकवर करण्यासाठी
1. सर्वात आधी तुम्ही आपल्या फोन मध्ये गूगल प्ले स्टोर वरून DiskDigger photo recovery ऍप डाउनलोड करा.
2. ऍप डाउनलोड झाल्यावर तो ओपेन करा.
3. तिथे तुम्हाला दोन पर्याय मिळतील. एक रूट फोन साठी आणि दुसरा अनरूट फोन साठी. अनरूट फोनचा पर्याय पहिलाच असेल तुम्हाला त्यावर क्लिक करायची आहे.

Disk Digger

4. क्लिक करून तुम्ही स्कॅन कराल तेव्हा हा तुमच्याकडे इमेज आणि मीडिया फाइल एक्सेस ची परवानगी मागेल. ती ओके करताच स्कॅन सुरु होईल आणि काही वेळातच फोन मधील सर्व डिलीटड फोटो स्क्रीन वर येतील.
5. तुम्ही फोटोज सीलेक्ट करून मेमरी कार्ड किंवा फिर फोन मेमरी मध्ये ट्रांसफर करू शकता.

डिलीटड वीडियो कसे करावेत रिकवर

Mobisaver

एंडरॉयड फोन मध्ये डिस्कडिगर व्यतिरिक्त तुम्ही मोबिसेवर ऍप ची मदत पण घेऊ शकता. हा ऍप फोटोज सोबतच वीडियो रिकवर करणसाठी पण आहे. जर तुम्ही डिलीटड वीडियो रिकवर करू इच्छित असला तर हा ऍप बेस्ट ऍप आहे. यासाठी
1. तुम्हाला गूगल प्ले स्टोर वरून EaseUS MobiSaver – Recover Files , SMS & Contacts ऍप डाउनलोड करा.
2. यात खाली फोटो आणि वीडियोजचा पर्याय मिळेल तुम्हाला त्यावर क्लिक करा. मग स्कॅन सुरु होईल आणि काही मिनिटनात सर्व डेटा तुमच्या समोर असेल.
3. तुम्ही डिलीटड फोटो सलेक्ट करून रिकवर करू शकता.

इथे लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे जर तुम्ही तुमचा फोन फॅक्टरी डेटा रिसेट किंवा कार्ड फॉर्मेटकेला असेल तर रिकवरी करणे कठीण होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here