Categories: बातम्या

5,010mAh Battery आणि 50MP Camera सह Dual Stereo Speakers असलेला हा मोबाइल झाला ग्लोबली लाँच

टेक ब्रँड टीसीएल भारतीय बाजारात अ‍ॅक्टिव्ह नाही परतुं या कंपनीचे फोन ग्लोबल मार्केटमध्ये खूप पसंद केले जात आहेत. विस्वदेशी बाजारात हा लो बजेट स्मार्टफोन लाँच करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये कंपनीकडून एक नवीन मोबाइल TCL 505 सादर करण्यात आला आहे जो मोठी बॅटरी आणि पावरफुल कॅमेऱ्यासह आला आहे. हा डिव्हाइस भारतीय बाजारात तो सेलसाठी उपलब्ध नाही परतुं मोबाइलचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स त्याला खास बनवितात, ज्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

TCL 505 स्पेसिफिकेशन्स

  • 6.75″ HD+ 90Hz Display
  • MediTek Helio G35
  • 4GB RAM Expansion
  • 50MP Real Camera
  • 10W 5,010mAh Battery
  • स्क्रीन: हा स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.75 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. हा स्क्रीन ब्रँड NxtVision reflection-free coatingसह आहे जो घातक ब्लू लाइटला कट करतो. यावर 90हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 400निट्स ब्राइटनेस मिळतो.
  • परफॉर्मन्स : टीसीएल 505 लेटेस्ट अँड्रॉइड 14 ओएसवर लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी35 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.2गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी यात आईएमजी जीई8320 जीपीयू आहे.
  • मेमरी: हा टीसीएल स्मार्टफोन 4जीबी रॅम एक्सपांशन टेक्नॉलॉजीसह आहे. या टेक्नॉलॉजीनुसार फोनमध्ये असलेली 4 जीबी फिजिकल रॅम मध्ये 4जीबी वचुर्अल रॅम जोडून याला 8 जीबी रॅमची ताकद दिली जाऊ शकते. तसेच हा स्मार्टफोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला पण सपोर्ट करतो.
  • कॅमेरा: फोटोग्राफीसाठी हा फोन ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल मेन सेन्सर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी TCL 505 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी टीसीएल 505 स्मार्टफोनमध्ये ताकदवान 5,010एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या मोठ्या बॅटरीसह 10 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट पण मिळतो.
  • अन्य फिचर्स : सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर मिळतो. तसेच हा टीसीएल स्मार्टफोन 3.5mm Audio Jack, Bluetooth version 5.1 आणि NFC सारख्या फिचर्सला पण सपोर्ट करतो.

TCL 505 किंमत

कंपनीकडून सध्या या मोबाइल फोनच्या किंमतीवरुन पडदा उठविण्यात आलेला नाही. अधिकृत वेबसाइटवर टीसीएल 505 4GB RAM + 128GB Storage सह लिस्ट झाला आहे जो ग्लोबल मार्केटमध्ये Ocean Blue आणि Space Grey कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. तसेच या फोनची किंमत भारतीय चलनानुसार 15 हजार रुपयांच्या आसपास असू शकते.

Published by
Kamal Kant