सॅमसंग येत्या 28 जानेवारीला आपली नवीन स्मार्टफोन सीरीज ‘गॅलेक्सी एम’ सादर करणार आहे. सॅमसंग या सीरीजची सुरवात सर्वात आधी भारतात करेल नंतर हा फोन इतर बाजारांत जाईल. सॅमसंग ने लॉन्च डेट सोबत गॅलेक्सी एम सीरीज मध्ये कोणते फोन लॉन्च केले जातील याचा खुलासा केला आहे. पण लॉन्चच्या आधीच 91मोबाईल्सला गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 च्या किंमतीची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 च्या किंमतीचा खुलासा 91मोबाईल्सच्या विश्वसनीय सूत्रांनी केला आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार भारतात लॉन्च होणार गॅलेक्सी एम10 सॅमसंगच्या या सीरीजचा सर्वात स्वस्त फोन असेल जो 8,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल. तसेच सॅमसंग गॅलेक्सी एम20 12,990 रुपयांमध्ये लॉन्च करेल. विशेष म्हणजे गॅलेक्सी एम20 एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये लॉन्च होऊ शकतो, त्यामुळे 12,990 रुपये या फोनच्या बेस वेरिएंटची किंमत असू शकते.
गॅलेक्सी एम सीरीज सॅमसंगची पहिली स्मार्टफोन सीरीज आहे जी ‘वी’ शेप वाल्या नॉच सह लॉन्च होईल. सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज साठी शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर वेबपेज बनवण्यात आला आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि 28 जानेवारीला लॉन्च होणारे हे फोन अमेझॉन वर एक्सक्लूसिव विकले जातील. प्राप्त माहितीनुसार गॅलेक्सी एम10 मध्ये 3500एमएएच ची बॅटरी असेल तर गॅलेक्सी एम20 5000एमएएच च्या मोठ्या दमदार बॅटरी सह लॉन्च केला जाईल.