50MP Camera सह लाँच झाले Vivo Y36 4G आणि 5G फोन, मिळेल 16GB RAM ची पावर

Highlights

  • ह्यात 8GB Virtual RAM आहे.
  • फोन 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.
  • विवो वाय36 ला IP54 रेटिंग मिळालं आहे.

विवोनं आज आपल्या ‘वाय’ सीरीजचा विस्तार करत दोन नवीन स्मार्टफोन Vivo Y36 4G आणि Vivo Y36 5G लाँच केले आहेत. हे दोन्ही डिवायस सध्या इंडोनेशियामध्ये सादर करण्यात आले आहेत ज्यांच्या नावावरून समजले असेल की एकात 4जी नेटवर्क मिळेल तर दुसरा 5जी कनेक्टिव्हिटीसह येईल. पुढे नवीन वाय36 ची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

Vivo Y36 4G आणि Vivo Y36 5G प्राइस

विवो वाय36 4जी फोन 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेजसह मार्केटमध्ये आला आहे ज्याची किंमत IDR 3,399,000 आहे. ही प्राइस भारतीय करंसीनुसार 18,800 रुपयांच्या आसपास आहे. कंपनीनं अजूनतरी वाय36 5जी फोनच्या मेमरी व्हेरिएंट तसेच त्याच्या किंमतीची माहिती दिली नाही. वाय36 4जी मॉडेल Glitter Aqua आणि Meteor Black तसेच 5जी मॉडेल Crystal Green आणि Mystic Black मध्ये आला आहे.

Vivo Y36 4G आणि Vivo Y36 5G स्पेसिफिकेशन्स

  • 6.44″ FHD+ 90Hz display
  • 50MP Rear camera
  • 44W 5,000mAh Battery
  • Qualcomm Snapdragon 680 (Vivo Y36 4G)
  • MediaTek Dimensity 6020 (Vivo Y36 5G)

स्क्रीन : विवो वाय36 च्या दोन्ही मॉडेल्समध्ये 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.44 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.

प्रोसेसर : Vivo Y36 4G फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे तसेच Vivo Y36 5G मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6020 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. दोन्ही मॉडेल अँड्रॉइड 13 आधारित फनटच ओएस 13 वर चालतात.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी दोन्ही फोन्सच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सल बोकेह लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हे फोन 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी वाय36 4जी आणि वाय36 5जी मॉडेल्समध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी विवो फोन 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आले आहेत.

इतर फीचर्स : विवोनं आपले नवीन फोन्स IP54 सर्टिफाइड बनवले आहेत ज्यामुळे वॉटर व डस्ट प्रूफ बनतात. ह्यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, एनएफसी सहित अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here