Infinix अशी कंपनी आहे जी कमी किंमतीत शानदार फीचर्स असलेले स्मार्टफोन सादर करते. काही दिवसनपूर्वी कंपनीनं भारतात Smart 6 Plus सादर केला होता. तर आता Infinix नं भारतात नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. आता कंपनी भारतात Infinix Hot 12 Pro स्मार्टफोन आणला आहे. इनफिनिक्सचा हा फोन Hot 12 सीरीजचा दुसरा फोन आहे. याआधी कंपनीनं Infinix Hot 12 Play लाँच केला आहे. आता Infinix नं भारतात Hot 12 सीरीजचा नवीन Infinix Hot 12 Pro मोस्ट प्रीमियम स्मार्टफोन लाँच केला आहे. इनफिनिक्सचा हा फोन दोन स्टोरेज ऑप्शनसह सादर करण्यात आला आहे. हा फोन पॉलीकार्बोनेट बॅकसह ब्लू आणि लाईटबस्टर ग्रीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल. इनफिनिक्सच्या या फोन दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.
Infinix Hot 12 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Infinix Hot 12 Pro स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनच्या फ्रंटला वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. फोनचा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. इनफिनिक्सचा हा फोन Unisoc T616 SoC वर चालतो.
इनफिनिक्सच्या या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे, त्याचबरोबर 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या फोनच्या फ्रंटला 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. Infinix Hot 12 Pro मध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग देण्यात आला आहे. फोनमध्ये USB Type-C पोर्ट, रियर माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर, 3.5mm हेडफोन जॅक आणि ड्युअल सिम कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. हा फोन Android 12 आधारित XOS 10.6 वर चालतो.
Infinix Hot 12 Pro ची किंमत
Infinix Hot 12 Pro स्मार्टफोन भारतात दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनचा बेस व्हेरिएंट 6GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे, ज्याची किंमत 10,999 रुपये आहे. या फोनचा दुसरा व्हेरिएंट 8GB रॅम व 128GB स्टोरेजसह सह 11,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. लाँच ऑफर अंतर्गत या फोनवर ICICI Bank आणि Kotak बँकेच्या ग्राहकांना 10 टक्के डिस्काउंट (1000 रुपयांपर्यत) मिळेल. म्हणजे फोन 9,999 रुपयांच्या इफेक्टिव्ह किंमतीत विकत घेता येईल. Hot 12 Pro ची विक्री फ्लिपकार्टवर 8 ऑगस्टपासून सुरु केली जाईल.