Vivo च्या 5G स्मार्टफोनवर जबरदस्त सूट; स्वस्तात मिळवा 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Reliance Digital वर इलेक्ट्रॉनिक्स आयटम्सवर धमाकेदार डील मिळत आहे. जर तुम्ही कमी बजेट नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर Vivo Y75 5G स्मार्टफोन तुमच्यासाठी चांगली चॉइस ठरू शकतो. विवोच्या या स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 16MP चा शानदार सेल्फी कॅमेरा मिळतो. तसेच या 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. ऑफर पाहता रिलायन्स डिजिटलवर विवोच्या या स्मार्टफोनवर 1500 रुपयांचा बँक डिस्काउंट दिला जात आहे.

Vivo Y75 5G डील आणि ऑफर

Vivo Y75 5G स्मार्टफोन को मार्केटमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज ऑप्शनसह लाँच झाला आहे. विवोच्या या फोनची किंमत 21,990 रुपये आहेत. रिलायन्स डिजिटलवरील ऑफर अंतगर्त या फोनवर ICICI बँकेच्या कार्डवर 1500 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. तसेच जर तुम्ही Mobikwik वॉलेटनं पेमेंट केलं तर 1000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. अशाप्रकारे विवोचा हा फोन तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. रिलायन्स डिजिटलवरून हा फोन हप्त्यांवर देखील विकत घेता येईल. हा फोन 1055.8 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी करता येईल. हे देखील वाचा: 15 हजारांच्या बजेटमध्ये 14GB रॅम असलेला 5G Phone; 50MP कॅमेऱ्यासह Realme 10 5G लाँच

Vivo Y75 5G स्पेसिफिकेशन्स

  • 6.58-इंच FHD+ डिस्प्ले
  • MediaTek Dimensity 700 प्रोसेसर
  • 8GB रॅम, 128GB स्टोरेज
  • 50MP + 2MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 16MP सेल्फी कॅमेरा
  • 5,000mAh बॅटरी, 18W फास्ट चार्जिंग

Vivo Y75 5G स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. विवोच्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 5G ला सपोर्ट करतो. तसेच हा फोन अँड्रॉइड 11 आधारित Funtouch OS 12 वर चालतो. यात सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी, 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: 513km रेंजसह Skoda Enyaq iV इलेक्ट्रिक एसयूव्ही लवकरच येणार भारतात! काही सेकंदात मिळेल सुपर स्पीड

Vivo Y75 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP (f/1.8 aperture) सेन्सर आहे, जोडीला 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. विवोच्या या फोनचा रियर कॅमेरा नाइट मोड, पोर्टेट, पॅनो, लाइव्ह फोटो, स्लो मोशन, टाइम लॅप्स आणि प्रो फोटोग्राफी मोडला सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G, ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS, BEIDOU, GLONASS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here