Realme 10 5G Launch बद्दल याआधी बातमी आली होती की येत्या 17 नोव्हेंबरला Realme 10 Series चीनमध्ये लाँच होईल. परंतु ग्लोबल मार्केटमध्ये Realme 10 4G फोन लाँच झाल्यावर दोन दिवसानींच रियलमी 10 5जी स्मार्टफोन चीनमध्ये ऑफिशियली अनाउंस झाला आहे. कंपनीनं Realme 10 5G Price आणि specifications जगासमोर ठेवले आहेत. रियलमी 10 5जी 15 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला आहे जो 50MP Camera, 8GB RAM आणि MediaTek Dimensity 700 चिपसेटला सपोर्ट करतो.
Realme 10 5G Price
रियलमी 10 5जी फोन चीनी बाजारात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा व्हेरिएंट 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतो. या दोन्ही व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे 1299 युआन आणि 1599 युआन आहे. हे देखील वाचा: 513km रेंजसह Skoda Enyaq iV इलेक्ट्रिक एसयूव्ही लवकरच येणार भारतात! काही सेकंदात मिळेल सुपर स्पीड
भारतीय करंसीनुसार Realme 10 5G 8GB RAM + 128GB storage 15,000 रुपयांमध्ये तर Realme 10 5G 8GB RAM + 256GB storage 18,000 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच झाला आहे. फोन Rijin Doujin (Gold) आणि Stone Crystal Black कलरमध्ये विकत घेता येईल.
Realme 10 5G specifications
रियलमी 10 5जी फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20.06:9 अॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 6.6 इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. या डिस्प्लेमध्ये 401पीपीआय आणि 400निट्स ब्राइटनेस सारखे फीचर्स देखील मिळतात.
Realme 10 5G अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. ऑक्टा-कोर प्रोसेसरसह रियलमी 10 5जी फोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 8 जीबी रॅमला सपोर्ट करतो, सोबत 6जीबी एक्सपांडेबल रॅम देण्यात आली आहे. म्हणजे गरज पडल्यास हा रियलमी मोबाइल 14जीबी रॅमची ताकद देऊ शकतो. रियलमी 10 5जी LPDDR4x RAM आणि UFS2.2 storage टेक्नॉलॉजी वर चालतो.
फोटोग्राफीसाठी रियलमी 10 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे, जोडीला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि एक एआय लेन्स मिळते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: रेडमीला सडेतोड उत्तर देण्याची तयारी; कमी किंमत, दमदार फीचर्ससह Realme 10 5G होऊ शकतो लाँच
रियलमी 10 5जी फोन ड्युअल सिम सपोर्टसह आला आहे ज्यात 3.5एमएम जॅकसह अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तसेच एआय फेस अनलॉक फिचर देखील आहे. पावर बॅकअपसाठी मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.