Realme C63 स्मार्टफोन लवकर घेऊ शकतो मार्केटमध्ये एंट्री, NBTC वेबसाईटवर आली माहिती

रियलमी येत्या काही दिवसामध्ये आपला नवीन सी सीरिज स्मार्टफोन Realme C63 बाजारात आणणार आहे. फोनची माहिती एनबीटीसी सर्टिफिकेशन वेबसाईटवर समोर आली आहे. तसेच याआधी डिव्हाईसने बीआयएससह इतर लिस्टिंग प्लॅटफॉर्मवर पण नोंदणी केली आहे. ज्यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की कंपनी काही आठवड्यांमध्ये डिव्हाईसची घोषणा करू शकते. चला, पुढे रियलमी सी 63 ची माहिती जाणून घेऊया.

Realme C63 एनबीटीसी लिस्टिंग

  • नवीन रियलमी डिव्हाईस मॉडेल नंबर RMX3939 सह थायलंडच्या NBTC सर्टिफिकेशन वेबसाईटवर पण दिसला आहे.
  • एनबीटीसी लिस्टिंगमध्ये फोनचे नाव Realme C63 पण दिसत आहे.
  • NBTC प्लॅटफॉर्मवर मॉडेल नंबर आणि नावाव्यतिरिक्त इतर कोणत्याही मोठ्या फिचरची माहिती मिळालेली नाही.
  • तसेच आतापर्यंत Realme C63 NBTC, BIS सह काही इतर सर्टिफिकेशन प्राप्त कर केले आहे, याचे लवकर लाँच होण्याचे संकेत आहेत.

Realme C63 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • एफसीसी लिस्टिंगनुसार Realme C63 मोबाईलमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. फोनला चार्ज करण्यासाठी 45W SuperVOOC चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो.
  • कॅमेरा FV-5 लिस्टिंगवर फोनच्या कॅमेऱ्याची माहिती समोर आली होती, यात 35 मिमी फोकल लेंथ, एफ/1.8 अपर्चर आणि 4096 × 3072 पिक्सल रिजॉल्यूशनसह 50MP चा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. तसेच, मोबाईलच्या फ्रंटला f/1.8 अपर्चर असलेला 8MP ची लेन्स लावली जाऊ शकते.
  • एफसीसी प्लॅटफॉर्ममुळे फोनच्या डिझाईनची माहिती मिळाली आहे, यानुसार Realme C63 प्लास्टिक आणि वेगन लेदर डिझाईनसह लाँच केला जाऊ शकतो.
  • फोनच्या प्लास्टिक मॉडेलचे वजन 189 ग्रॅम आणि डायमेंशन 167.26 x 76.67 x 7.74 मिमी सांगितले गेले आहे. तर लेदरचे वजन 191 ग्रॅम आणि डायमेंशन 167.26 x 76.67 x 7.79 मिमी असू शकते.
  • Realme C63 डिव्हाईस लेटेस्ट अँड्रॉईड 14 आधारित Realme UI वर रन करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here