Samsung Galaxy A52 5G स्मार्टफोन पुन्हा एकदा ऑनलाइन समोर आला आहे. यावेळी कथितरित्या हा अपकमिंग Samsung फोन चायनीज 3सी सर्टिफिकेशन वेबसाइट वर स्पॉट केला गेला आहे जिथे यातल्या चार्जिंग स्पीड बद्दल माहिती मिळाली आहे. तसेच हा फोन HTML5Test आणि गीकबेंच वेबसाइट सारख्या प्रमुख वेबसाइटवर स्पेसिफिकेशन सह लिस्ट झाला आहे. बोलले जात आहे कि गॅलेक्सी ए52 5जी फोन गेल्यावर्षी एप्रिल मध्ये लॉन्च झालेल्या Galaxy A51 5G स्मार्टफोनचा सक्सेसर डिवाइस असेल.
3C सर्टिफिकेशन मध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए52 5जी (मॉडेल नंबर एसएम-A5260) सह स्पॉट केला गेला आहे. या सर्टिफिकेशन वरून स्पष्ट झाले आहे कि Galaxy A52 5G मध्ये 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट (9VDC, 1.67A) असेल. तसेच हा फोन 5जी कनेक्टिविटी सह येईल. 3सी सर्टिफिकेशन मध्ये फोन बाबत कोणतीही खास माहिती समोर आली नाही.
हे देखील वाचा : Samsung TV च्या खरेदीवर मिळत आहे 23 हजार रुपयांचा स्मार्टफोन अगदी मोफत, जाणून घ्या ऑफर
HTML5Test वेबसाइटच्या लिस्टिंग मध्ये समोर आले होते कि गॅलेक्सी ए52 5जी अँड्रॉइड 11 वर काम करेल. तसेच यात असे पण सांगण्यात आले होते कि ब्राउजर स्कोर 555 पैकी 523 पॉईंट्स आहे. हा एका मिड-रेंज हँडसेटचा चांगला स्कोर आहे.
Samsung Galaxy A52 5G
गॅलेक्सी ए52 5जी ला गीकबेंच वर सिंगल-कोर टेस्ट मध्ये 298 आणि मल्टीकोर टेस्ट मध्ये 1001 स्कोर मिळवला आहे. गीकबेंच लिस्टिंग वरून असे पण समजले आहे कि स्मार्टफोन 1.80 बेस क्लॉक फ्रिक्वेन्सी आणि कोड नाव ‘लिटो’ सह ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येईल. गीकबेंच लिस्टिंगमसूर, असे वाटते कि सॅमसंग गॅलेक्सी ए52 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 750 जी SoC वर सादर केला जाईल. स्नॅपड्रॅगॉन 750G SoC वरून स्पष्ट झाले आहे कि गॅलेक्सी A52 5G कनेक्टिविटी सह सादर केला जाईल.
हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी आणि 4GB रॅम सह लॉन्च झाला Samsung चा स्वस्त फोन Galaxy M02s, जाणून घ्या किंमत
Geekbench लिस्टिंग मध्ये असे पण समजले आहे कि फोन मध्ये Adreno 619GPU सह 6GB रॅम आणि अँड्रॉइड 11 ओएस असेल. याआधी Galaxy Club ने आगामी गॅलेक्सी ए52 संबंधित माहिती सार्वजनिक केली होती. रिपोर्ट मध्ये आगामी फोनच्या रियर कॅमेरा सेटअपचा खुलासा केला गेला आहे. Galaxy Club चा दावा आहे कि फोन मध्ये आधीच्या वेरियंट प्रमाणेच 4 कॅमेरा दिले जातील. यात प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असेल. तसेच इतर तीन सेंसर आधीप्रमाणेच (अल्ट्रा-वाइड, मॅक्रो, डेप्थ) असतील. इतर सेंसरच्या मेगापिक्सल रिजोल्यूशन बाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.