एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन देखील आता मजबूत बॅटरी आणि बॅकअपसह येऊ लागले आहेत. जर तुम्हाला 10 हजार ते 15 हजार रुपयांच्या दरम्यान असा मोबाईल फोन घ्यायचा असेल जो मोठ्या बॅटरीला सपोर्ट करत आहे आणि अनेक तास चार्ज केल्याशिवाय राहू शकतो. तर आम्ही सप्टेंबर महिन्यात विकल्या जाणाऱ्या 5 नवीनतम आणि सर्वोत्तम स्मार्टफोनची माहिती शेअर केली आहेत. या सर्व फोनची 91 मोबाईलने वैयक्तिकरित्या चाचणी केली आहे आणि ते चार्ज करण्यासाठी किती वेळ लागतो, पूर्ण चार्ज केल्यानंतर ती किती तास टिकते आणि ऑनलाईन व्हिडिओ किंवा ऑनलाईन गेम खेळताना त्याची बॅटरी किती संपते हे देखील तपासले आहे.
मोठी बॅटरी असणारे मोबाईल फोन
Vivo T3x 5G
बॅटरी आणि चार्जिंग
Vivo T3X 5G फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 6,000 एमएएचची बॅटरी दिली आहे. 91 मोबाईलच्या पीसीमार्क चाचणीमध्ये त्याने 23 तास 33 मिनिटांचा जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. यामध्ये 30 मिनिटे यूट्यूब चालवल्यानंतर बॅटरी केवळ 3 टक्क्यांनी कमी झाली. तर अर्धा तास पबजी खेळल्यावर बॅटरी 6 टक्क्यांनी आणि 30 मिनिटे सीओडी मोबाईल गेम खेळल्याने बॅटरी 5 टक्क्यांनी कमी झाली. Vivo T3x 5G हा 44 वॉट फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करत आहे जो या मोठ्या बॅटरीला 60 मिनिटांत 20 टक्क्यांपासून ते पूर्ण 100 टक्के चार्ज करतो.
किंमत आणि स्पेसिफिकेशन
- 4GB रॅम + 128GB मेमरी – 13,499 रुपये
- 6GB रॅम + 128GB मेमरी – 14,999 रुपये
- 8GB रॅम + 128GB मेमरी – 16,499 रुपये
Vivo T3X 5G फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 प्रोसेसरवर काम करतो ज्यामध्ये 8 जीबी फिजिकल रॅमसह 8 जीबी व्हर्च्युअल रॅम देखील मिळत आहे. हा मोबाईल फोन 120Hz रिफ्रेश रेट असलेल्या 6.72 इंचाच्या एचडीप्लस डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी यात 50 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन IP64 रेटिंगला सपोर्ट करतो. संपूर्ण तपशीलासाठी येथे क्लिक करा
iQOO Z9x 5G
बॅटरी आणि चार्जिंग
हा iQOO मोबाईल देखील 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 6,000 एमएएच ची बॅटरी देतो. ही बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 20 तास, 19 मिनिटांचा पीसीमार्क बॅटरी स्कोअर प्रदान करते. iQOO Z9x 5G फोन त्वरीत चार्ज करण्यासाठी त्यात 44 वॉट फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देखील आहे जे केवळ 61 मिनिटांत 20 टक्क्यांपासून ते 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करते. 91मोबाईल्स च्या 30 मिनिटांच्या चाचणीत या फोनची बॅटरी युट्युब मध्ये 4%, पबजी मध्ये 5% आणि सीओडी मोबाईल गेममध्ये 6% कमी झाली.
किंमत आणि स्पेसिफिकेशन
- 4GB रॅम + 128GB स्टोरेज = ₹12,999
- 6GB रॅम + 128GB स्टोरेज = ₹14,499
- 8GB रॅम + 128GB स्टोरेज = ₹15,999
iQOO Z9X 5G फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेटवर काम करतो. या मोबाईलमध्ये 8 जीबी रॅम सोबत 8 जीबी व्हर्च्युअल रॅम देखील दिली गेली आहे जी याला 16 जीबी रॅमची शक्ती देते. तर फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. iQOO Z9x 5G फोन 6.72 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर काम करतो. फोनच्या तपशीलवार माहितीसाठी येथे क्लिक करा
Moto G64 5G
बॅटरी आणि चार्जिंग
Moto G64 5G फोन 6,000 एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. आमच्या पीसीमार्क चाचणीमध्ये ही 18 तास आणि 39 मिनिटांपर्यंत चालली. त्याचवेळी 30 मिनिटांपर्यंत युट्युब व्हिडिओ चालवल्यावर फोनची बॅटरी 4 टक्क्यांनी कमी झाली. त्याचप्रमाणे बॅटरी ड्रॉप तपासण्यासाठी यामध्ये अर्धा तास पबजी आणि अर्धा तास सीओडी मोबाईल खेळले गेले तेव्हा दोन्ही वेळेस बॅटरीमध्ये 6 टक्क्यांची घट झाली. हा मोबाईल 30 वॉट फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो ज्याने आमच्या चाचणीमध्ये फोनला 20 टक्क्यांपासून ते 100 टक्के चार्ज करण्यासाठी 70 मिनिटांचा वेळ घेतला.
किंमत आणि स्पेसिफिकेशन
- 8GB रॅम + 128GB स्टोरेज = ₹14,999
- 12GB रॅम + 256GB स्टोरेज = ₹16,999
Moto G64 5G हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे जो मीडियाटेक डायमेंसिटी 7025 चिपसेटवर लाँच झाला आहे. यामध्ये 6.5 इंचाचा एफएचडी+ एलसीडी डिस्प्ले मिळत आहे जो 120Hz रिफ्रेश रेटवर काम करतो. फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सेलचा ओआयएस आणि 8 मेगापिक्सेलची मॅक्रो + डेप्थ लेन्स दिली गेली आहे आणि फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. तुम्हाला सांगतो की Moto G64 5G फोनमध्ये 1 टीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डचा वापर केला जाऊ शकतो आणि त्यात IP52 रेटिंग आणि 14 5G बँड्स सारखे फिचर्स मिळत आहेत. संपूर्ण तपशीलासाठी येथे क्लिक करा
Realme 12x 5G
बॅटरी आणि चार्जिंग
Realme 12X 5G फोन भारतीय बाजारपेठेत एप्रिल महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध झाला होता, ज्यामध्ये 5,000 एमएएच ची बॅटरी दिली गेली आहे. ही बॅटरी 17 तास आणि 22 मिनिटांचा पीसीमार्क बॅटरी स्कोअर मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. मोठ्या बॅटरीसह 45 वॉट फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाचे समन्वय या फोनला आणखी चांगला बनवते. केवळ 52 मिनिटांतच ही 20 टक्क्यांपासून ते 100 टक्के चार्ज होऊ शकते. तर फोनवर अर्धा तास 4K युट्युब व्हिडिओ पाहिल्याने केवळ 4% बॅटरी कमी होते. आम्ही जेव्हा मोबाईलवर अर्धा तास पबजी खेळलो तेव्हा त्याची बॅटरी 9% कमी झाली आणि जेव्हा आम्ही सीओडी खेळलो तेव्हा ती 10% कमी झाली.
किंमत आणि स्पेसिफिकेशन
- 4GB रॅम + 128GB स्टोरेज = ₹11,999
- 6GB रॅम + 128GB स्टोरेज = ₹13,499
- 8GB रॅम + 128GB स्टोरेज = ₹14,999
Realme 12X 5G फोन मीडियाटेक डायमेंसिटी 6100+ ऑक्टाकोर प्रोसेसरवर काम करतो. या फोनमध्ये 8 जीबी एक्सपॅंडेबल रॅम टेक्नॉलॉजी आहे जी फिजिकल रॅम सोबत मिळून याला 16 जीबी पर्यंत वाढवते. फोटोग्राफीसाठी यात 50 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. Realme 12X 5G फोन 120Hz रिफ्रेश रेट असलेल्या 6.72 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. Realme 12x 5G स्मार्टफोनचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन बद्दलच्या इतर माहितीसाठी येथे क्लिक करा
Realme Narzo N65 5G
बॅटरी आणि चार्जिंग
Narzo N65 5G फोन 5,000 एमएएच च्या बॅटरीला देखील सपोर्ट करतो ज्याने पीसीमार्क बॅटरी चाचणीमध्ये 17 तास आणि 16 मिनिटांचा स्कोअर मिळवला आहे. 91मोबाईलच्या चाचणी दरम्यान ही बॅटरी 30 मिनिटांचा युट्युब 4K व्हिडिओ स्ट्रिमिंग केल्यानंतर 4 टक्क्यांनी कमी झाली. तर, अर्धा-अर्धा तास पबजी आणि सीओडी मोबाईल गेम खेळल्यानंतर बॅटरीमध्ये अनुक्रमे 6 टक्के आणि 4 टक्के घट दिसून आली. लक्षात घेण्यासारखे आहे की या मोबाईलमध्ये 15 वॉट चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे ज्यामध्ये 5,000 एमएएच च्या मोठ्या बॅटरीला 20 ते 100 टक्के चार्ज करण्यासाठी 149 मिनिटांचा वेळ लागतो.
किंमत आणि स्पेसिफिकेशन
- 4GB रॅम + 128GB स्टोरेज = ₹11,499
- 6GB रॅम + 128GB स्टोरेज = ₹12,499
Realme Narzo N65 5G फोन मीडियाटेक डायमेंसिटी 6300 5G वर काम करतो. यात 6 जीबी डायनॅमिक रॅम आहे जी फिजिकल रॅमसोबत मिळून 12 जीबी रॅमची शक्ती देते. त्याच्या मागील पॅनलवर 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि समोर 8 मेगापिक्सेलचा सेल्फी उपलब्ध आहे. हा मोबाईल 120Hz रिफ्रेश रेटवर काम करणाऱ्या 6.67 इंचाच्या एचडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. NARZO N65 5G फोनमध्ये IP54 रेटिंग आणि रेनवॉटर स्मार्ट टच तंत्रज्ञान देखील मिळत आहे. या स्वस्त रिअलमी मोबाईलच्या संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा