64MP कॅमेरा असलेल्या Redmi 50i 5G च्या लाँचची तारीख समजली

Xiaomi च्या सब ब्रँड रेडमीनं काही दिवसांपूर्वी एक मोठी घोषणा केली होती. कंपनीची रेडमी के सीरिज भारतात तीन वर्षानंतर पुनरागमन करत आहे. 2019 नंतर या सीरिजचे स्मार्टफोन फक्त चीनपुरते मर्यादित करण्यात आले होते. आता Redmi नं कंफर्म केलं आहे की, Redmi 50i 5G स्मार्टफोन भारतात 20 जुलैला लाँच केला जाईल. Redmi 50i 5G स्मार्टफोन भारतात मीडियाटेकच्या Dimensity 8100 प्रोसेसर आणि 64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह सादर केला जाईल. त्यामुळे या हँडसेटचा थेट मुकाबला OnePlus 10R स्मार्टफोनशी असेल.

Redmi 50i 5G स्मार्टफोन भारतात 20 जुलैला लाँच केला जाईल. अशी माहिती रेडमीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीनं रेडमी के सीरिजच्या पुनरागमनाची माहिती दिली होती. तेव्हा कंपनी या सीरिजमध्ये भारतात लाँच होणाऱ्या हँडसेटच्या नावाची माहिती दिली नव्हती. 91मोबाईल्सच्या माहितीनुसार, Redmi K50i स्मार्टफोन शाओमीच्या मिड रेंज Redmi Note 11T Pro चा रिब्रँड व्हर्जन असेल. 91mobiles नं शाओमीच्या या आगामी स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स याआधीच शेयर केले आहेत.

Redmi K50i 5G भारतीय व्हेरिएंट

प्राईसबाबाच्या एक्सक्ल्युसिव्ह रिपोर्टनुसार Redmi K50i 5G स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये भारतात लाँच केला जाईल. या स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात येईल. तसेच टॉप एन्ड मॉडेलमध्ये साथ 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळू शकते. रेडमीचा हा फोन फँटम ब्लू, स्टील्थ ब्लॅक आणि क्विक सिल्वर अशा तीन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात येईल.

Redmi K50i चे स्पेसिफिकेशन्स

Redmi K50i स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 144Hz पिक्सल असेल. हा डिस्प्ले Dolby Vision, DC Dimming, पंच होल कटआउट, नॅरो बेझल आणि कोर्निंग ग्लास लेयर सह येतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 8100 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. ग्राफिक्ससाठी ARM Mali-G610 MC6 GPU चा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर 8GB RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. रेडमीच्या या फोनमध्ये Android 12 आधारित MIUI 13 कस्टम स्किन देण्यात आली आहे.

Redmi K50i स्मार्टफोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरक्षा मिळते. फोनमध्ये Hi-Res ऑडियो, Dolby Atmos आणि स्टीरियो स्पिकर असे जबरदस्त फीचर्स मिळतात. कनेक्टव्हिटीसाठी 3.5mm ऑडियो जॅक, 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, Bluetooth 5.3, GPS, NFC, आणि USB Type-C पोर्ट मिळतो.

कॅमेरा सेगमेंट पाहता, Redmi K50i स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. फोनमध्ये 64MP चा Samsung GW1 सेन्सर प्रायमरी कॅमेरा म्हणून देण्यात आला आहे. सोबतीला 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. या रेडमी फोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5080mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here