8GB RAM सह Vivo Y35 5G Phone ची चीनमध्ये एंट्री

Vivo Y35 5G Launch: विवो कंपनीनं आज टेक मंचावर आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत अजून एक नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं लो बजेट 5जी सेगमेंटमध्ये Vivo Y35 5G लाँच केला आहे जो एक मिडियोकर फोन म्हणता येईल. सध्या हा फोन कंपनीनं चीनमध्ये सादर केला आहे परंतु लवकरच भारतासह जगभरात हा हँडसेट लाँच केला जाऊ शकतो. विवो वाय35 5जी मध्ये तुम्हाला 8GB RAM, MediaTek Dimensity 700 चिपसेट आणि 5,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स मिळतील. विवोच्या या नव्या स्वस्त 5G फोनची माहिती पुढे देण्यात आली आहे.

विवो वाय35 5जी ची किंमत

Vivo Y35 5G फोन तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. हे व्हेरिएंट 4GB RAM + 128GB Storage, 6GB RAM + 128GB Storage आणि 8GB RAM + 128GB Storage सह सादर करण्यात आले आहेत, ज्यांची किंमत अनुक्रमे 1199 युआन (जवळपास 14,000 रुपये), 1399 युआन (जवळपास 16,500 रुपये) आणि 1499 युआन (जवळपास 17,500) रुपये आहे. चीनमध्ये Vivo Y35 5G Black, Gold आणि Blue कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: Akshay Kumar मराठी पदार्पणासाठी सज्ज; ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ च्या सेटवरून शेयर केला नवा व्हिडीओ

विवो वाय35 5जी चे स्पेसिफिकेशन्स

विवो वाय35 5जी फोन 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. या मोबाइल फोनच्या स्क्रीन मध्ये 269पीपीआय, 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशियो आणि 70% एनटीएससी कलर गामुट सारखे फीचर्स देखील मिळतात.

Vivo Y35 5G लेटेस्ट ओएस अँड्रॉइड 13 आधारित ओरिजनओएस ओशियनवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. हा 5जी विवो फोन 8GB LPDDR4X RAM आणि 128GB UFS 2.2 storage टेक्नॉलॉजीवर चालतो.

फोटोग्राफीसाठी विवो वाय35 5जी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, सोबत 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/1.8 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: सर्वात मोठा कॅमेरा सेन्सर आणि शक्तिशाली प्रोसेसर; Xiaomi 13 सीरिजची नवी लाँच डेट आली

Vivo Y35 5G ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर देखील चालतो. सिक्योरिटीसाठी या फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे तर पावर बॅकअपसाठी हायह विवो मोबाइल 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. या विवो स्मार्टफोनचे डायमेंशन 164.05 × 75.60 × 8.15एमएम आणि वजन 186ग्राम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here