64MP कॅमेरा आणि 66W फास्ट चार्जिंगसह Honor 80 SE 5G लाँच

Honor नं आज टेक मार्केटमध्ये आपली नवीन ऑनर 80 सीरीज सादर केली आहे. या सीरीज अंतगर्त Honor 80 SE, Honor 80 आणि Honor 80 Pro स्मार्टफोन लाँच झाले आहेत जे शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह येतात. ऑनर 80 एसई या सीरीजचा सर्वात अफॉर्डेबल स्मार्टफोन आहे जो 64MP Camera, 66W Charging, 12GB RAM आणि MediaTek Dimensity 900 चिपसेटला सपोर्ट करतो. पुढे Honor 80 SE Price आणि Specifications डिटेल्स देण्यात आले आहेत.

Honor 80 SE Specifications

ऑनर 80 एसई स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन कर्व्ड ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. या फोनची स्क्रीन बेजल लेस आहे जिच्या वरच्या बाजूला मध्यभागी पंच-होल देण्यात आला आहे. हा होल बॉडी एजपासून लांब आहे. फोन डिस्प्लेमध्ये 1920हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग आणि 1.07एम कलरचा सपोर्ट मिळतो. हे देखील वाचा: ‘किंग ऑफ गेमिंग स्मार्टफोन्स’ येतोय बाजारात; पावरफुल iQOO 11 5G Phone ची लाँच डेट आली समोर

64mp camera phone honor 80 se 5g launched know price specification details

Honor 80 SE अँड्रॉइड 12 आधारित मॅजिकओएस 7.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर तसेच मीडियाटेक डिमेनसिटी 900 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन माली-जी68 जीपीयूला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन 12 जीबी पर्यंत इंटरनल रॅम तसेच 7जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो. म्हणजे हेव्ही प्रोसेसिंग दरम्यान Honor 80 SE 19जीबी रॅमची ताकद देऊ शकतो.

64mp camera phone honor 80 se 5g launched know price specification details

फोटोग्राफीसाठी Honor 80 SE ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ऑनर 80एसई स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

64mp camera phone honor 80 se 5g launched know price specification details

Honor 80 SE स्मार्टफोन 5जी आणि 4जी दोन्ही सपोर्टसह येतो. सिक्योरिटीसाठी या मोबाइल फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी ऑनर 80 एसई 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,600एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. Honor 80 SE स्मार्टफोनसह WiFi 5, Bluetooth 5.1, GNSS सोबतच Hi-Res Audio (wired and wireless) देखील मिळतो. हे देखील वाचा: Aadhaar आणि Voter ID असं करा ऑनलाइन लिंक, जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

Honor 80 SE Price

ऑनर 80 एसई स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे जिची किंमत 2399 युआन म्हणजे भारतीय करंसीनुसार जवळपास 27,400 रुपये आहे. तर मोठा Honor 80 SE 12GB RAM + 256GB Storage व्हेरिएंट 2699 युआन म्हणजे 30,800 रुपयांच्या रेंज मध्ये लाँच झाला आहे. हा फोन चीनी मार्केटमध्ये Moonlight Crystal, Iceland Fantasy, Cherry Pink Coral आणि Bright Black कलर्ससह आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here