कोणत्या बँडवर चालतंय तुमचं Jio, Airtel, BSNL सिम! काही क्लिक्समध्ये मिळवा माहिती

जेव्हापासून भारतात 5G सर्व्हिस लाँच झाली आहे तेव्हापासून फोन्समधील बँड सपोर्टची चर्चा वाढली आहे. तुम्हाला देखील अनेकदा प्रश्न पडला असेल की तुमच्या फोनमध्ये कोणकोणते बँड आहेत आणि नेटवर्क ऑपरेटर्स तुम्हाला कोणत्या स्पेक्ट्रम बँडवर सेवा देत आहेत? आज आम्ही तुम्हाला तुमच्या फोनमध्ये नेटवर्क बँडची माहिती मिळवण्याची पद्धत सांगणार आहोत. तसेच Jio, Airtel, Vodafone आणि BSNL सारख्या कंपन्या तुम्हाला कोणत्या स्पेक्ट्रम बँडवर सर्व्हिस देतात हे देखील पाहणार आहोत.

अशाप्रकारे मिळवा नेटवर्क बँडची माहिती

तुम्ही कंपनीच्या वेबसाइट किंवा अन्य ऑनलाइन साइटवर जाऊन देखील फोनमधील बँड सपोर्ट माहिती मिळवू शकता परंतु तुमची ऑपरेटर कोणत्या बँडवर सर्व्हिस देते हे मात्र समजणार नाही. कारण फोनमध्ये 2G, 3G, 4G आणि 5G साठी एकावेळी एकच बँडवर सर्व्हिस मिळेल. पुढे आम्ही फोनमध्ये स्पेक्ट्रम बँडची माहिती मिळवण्याच्या दोन पद्धती सांगितल्या आहेत. हे देखील वाचा: ChatGPT: तुमची नोकरी घालवू शकतो हा रोबॉट? गुगलपेक्षा फास्ट देतो प्रश्नांची उत्तरे, असं वापरा मोबाइलवर

  • शॉर्ट कोडद्वारे जाणून घ्या स्पेक्ट्रम बँड
  • अ‍ॅपद्वारे जाणून घ्या स्पेक्ट्रम बँड
  • 5G बँडची माहिती अशी मिळवा

शॉर्ट कोडद्वारे जाणून घ्या स्पेक्ट्रम बँड

शॉर्ट कोडद्वारे स्पेक्ट्रम बँड जाणून घेणं खूप सोपं आहे. यात तुम्हाला सध्या कोणत्या स्पेक्ट्रम बँडवर तुमचा फोन काम करत आहे, एवढंच समजेल. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जा आणि इथे कनेक्शनवर क्लिक करा. या सेगमेंटमध्ये खाली मोबाइल नेटवर्कचा ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करा. इथे तुम्ही तुमचा फोन ऑटो कनेक्ट मोडवर सेट करा. ज्यात 5जी, एलटीई, 3जी आणि 2जी सारखे सर्व नेटवर्क येतात.

आता डायलरवर जा आणि फोनमध्ये *#0011#* कोड डायल करा. म्हणजे फोनमध्ये सिम इंफॉर्मेशन येईल. जर दोन सिम असतील दोन ऑप्शन मिळतील. त्यामुळे एकएक करून जाणून घेऊ शकता की कोणता ऑपरेटर कोणत्या बँडवर सर्व्हिस देत आहे. पुढील स्क्रीन शॉटमध्ये तुम्ही पाहू शकता जियो बँड 3 वर सर्व्हिस देत आहे. तर एयरटेल 40 बँडवर. आता या बँडचा तपशील पाहता बँड 3, 1800 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम बँड आहे तर बँड 40, 2300 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम बँडसाठी आहे. अशाप्रकारे कोडद्वारे तुम्ही स्पेक्ट्रम बँडची माहिती मिळवू शकता.

अ‍ॅपद्वारे जाणून घ्या स्पेक्ट्रम बँड

अ‍ॅपच्या माध्यमातून देखील स्पेक्ट्रम बँडची माहिती मिळवणे सोपं आहे. यासाठी फोनमध्ये नेट मॉन्स्टर आणि जी-मॉन प्रो सारखे अ‍ॅप डाउनलोड करता येतील.

नेट मॉन्स्टर अ‍ॅप ओपन केल्यावर नेटवर्क ऑपरेटरसह स्पेक्ट्रम बँडची माहिती मिळेल. तसेच खाली स्क्रोल केल्यास नेटवर्क हिस्ट्री देखील समजेल. ड्युअल सिम फोनमध्ये खाली कारचा लोगो असेल तिथे जाऊन सिम बदलता येईल आणि दुसऱ्या सिमचे फ्रीक्वेंसी बँड बघता येतील.

जी-मॉन प्रो मध्ये नेटवर्क फ्रीक्वेंसी अजून चांगल्या पद्धतीनं दाखवतो. अ‍ॅप ओपन करताच खाली तुम्हाला फ्रीक्वेंसी बँडची माहिती मिळते. तसेच डावीकडे तुम्हाला मिळणाऱ्या सर्व्हिस नेटवर्कची माहिती पण मिळेल. यात सर्वात चांगली बाब म्हणजे खाली नेटवर्क हिस्ट्री असते जिच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की कोणत्या फ्रीक्वेंसी बँडवर तुमच्या ऑपरेटर कंपनीनं तुम्हाला सर्व्हिस दिली आहे. फोनमध्ये ड्युअल सिम असेल तर वरच्या बाजूला सिमचे चिन्ह असेल ज्यावर क्लिक करून सिम स्विच करता येईल.

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या फोनमध्ये स्पेक्ट्रम बँडची माहिती मिळवू शकता. तुम्ही फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन कनेक्शनवरून नेटवर्क ओनली 2G, ओनली 3G किंवा ओनली LTE करून 2G आणि 3G साठी वापरात असलेल्या नेटवर्क बँड विषयी जाणून घेऊ शकता. हे देखील वाचा: मोफत करा Mobile Repairing Course, महिन्याला होऊ शकते 25 ते 30 हजारांची कमाई

5G बँडची अशी मिळवा माहिती

जर तुमच्या फोनमध्ये 5जी सर्व्हिस असेल तर जेव्हा नेट मॉन्स्टर अ‍ॅप ओपन केल्यावर तुम्हाला 5जी नेटवर्क टेक्नॉलॉजीची माहिती मिळेल. इथे सध्या SA आणि NSA लिहिण्यात आलं आहे. यात कंपनी बँडची माहिती देत नाहीत परंतु तुम्हाला 5G साठी कोणत्या प्रकारची सर्व्हिस मिळते, हे समजेल. जसे की Jio नं आपल्या 5G ला True 5G म्हटलं आहे कारण कंपनी SA म्हणजे स्टॅन्ड-अलोन 5G सर्व्हिस देत आहे. तर Airtel ची सर्व्हिस NSA आहे, अर्थात नॉन स्टॅन्ड-अलोन म्हणजे 4जी आर्किटेक्चर बेस्ड 5जी सर्व्हिस देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here